ETV Bharat / bharat

'भैया तेजस्वी हमार हमनी के प्यारा लागेलन, सुख-दुःख में जनता के साथ सबसे आगे चलेलन..'; आरजेडीचे गाणे लाँच - तेजस्वी यादव लेटेस्ट न्यूज

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या प्रचार अभियानाअंतर्गत एक गाणे लाँच करण्यात आले आहे. हे प्रचार गाणे 3.16 मिनिटांचे असून, 'भैया तेजस्वी हमार हमनी के प्यारा लागेलन, सुख-दुःख में जनता के साथ सबसे आगे चलेलन..' असे या गाण्याचे बोल आहेत.

तेजस्वी यादव
तेजस्वी यादव
author img

By

Published : Oct 18, 2020, 2:56 PM IST

नवी दिल्ली - बिहार निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहेत. भाजपाविरोधात काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि डावे पक्षांनी एकत्र येत महागठबंधन केले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असून त्यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन निवडणूक लढणार आहे. तेजस्वी यांच्या प्रचार अभियानाअंतर्गत एक गाणे लाँच करण्यात आले आहे. हे प्रचार गाणे 3.16 मिनिटांचे असून, 'भैया तेजस्वी हमार हमनी के प्यारा लागेलन, सुख-दुःख में जनता के साथ सबसे आगे चलेलन..' असे या गाण्याचे बोल आहेत.

  • माटी बिहार जेकर माथा में सजेला
    जनहित के ख़ातिर जे पल पल जिएला
    जनता के हक़ की लड़ाई लड़ेला
    जनसेवा वाला राह जे चलेला

    भैया तेजस्वी हमार हमनी के प्यारा लागेलन
    सुख-दुःख में जनता के साथ सबसे आगे चलेलन pic.twitter.com/1GyJ3n5l2v

    — Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) October 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तेजस्वी यादव यांच्यासह व्हिडीओमध्ये तेजप्रताप यादव हेही पाहायला मिळतात. तसेच, जगदानंद सिंह आणि रामचंद्र पूर्वेही व्हिडीओमध्ये दिसतात. तर व्हिडीओच्या शेवटी 'तेजस्वी भव: बिहार' असे लिहिण्यात आले आहे. तर काही दिवसांपूर्वी आरजेडीने 'विजयी होगा बिहार' हे गाणे लाँच केले होते.

बिहार निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी शनिवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी, आरजेडी नेते तेजस्वी यांच्यासह कॉंग्रेस नेते रणदीपसिंग सुरजेवाला आणि शक्तीसिंह गोहिल व अन्य नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी 'बिहारमध्ये 'डबल इंजिन'चे सरकार आहे. नितीशकुमार गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत आहेत. परंतु, अद्याप राज्याला विशेष प्रवर्गाचा दर्जा देण्यात आलेला नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इथे येऊन राज्याला विशेष दर्जा देणार नाहीत, अशी टीका केली होती.

243 विधानसभा जागा असणार्‍या बिहारमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला मतदान होईल. निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.