कोलकाता - पश्चिम बंगालमधील शिक्षकांनी वेतनवाढीसह इतर मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आंदोलन केले आहे. राज्य सरकार मागण्या मान्य करत नसल्यामुळे शिक्षकांनी कोलकाता येथे विकास भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवले.
मागील आठवड्यातच शिक्षकांनी मागण्याचे निवेदन दाखवत विरोध प्रदर्शन केले होते. यावेळी शिक्षकांना राज्याचे शिक्षणमंत्र्यांसोबत भेट घडवून आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, असे दिसताच शिक्षकांनी विकास भवनाला घेराव घालण्याचे ठरवले.