हैदराबाद - तमिलिसाई सौंदरराजन यांनी आज (रविवारी)तेलंगाणा राज्याच्या राज्यपाल म्हणून शपथ घेतली. पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. तेलंगाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राघवेंद्र सिंह चौहान यांनी सौंदरराजन त्यांना शपथ दिली.
शपथग्रहण कार्यक्रमाला तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी, भाजप नेते बंडारू दत्तात्रय, तेलंगणा विधानसभेचे अध्यक्ष पोचाराम श्रीनिवास रेड्डी उपस्थित होते. सौंदरराजन यांच्यापूर्वी ई. एल. एस नरसिंह तेलंगाणाचे राज्यपाल होते.
तमिलिसाई सौंदरराजन या ५८ वर्षांच्या आहेत. तामिळनाडूमध्ये भाजप पक्षाच्या प्रमुख आणि पक्षाच्या राष्ट्रीय सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. १ सप्टेंबरला राष्ट्रपतींनी सौंदरराजन यांची तेलंगाणाच्या राज्यपाल म्हणून घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी आता पदग्रहण केले आहे.