ETV Bharat / bharat

विजय मल्ल्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी - new delhi

विजय मल्ल्याच्या देशातील विविध बँकांचे ९००० कोटींचे कर्ज आणि मनी लाँड्रिंगचे आरोप आहे. मल्ल्याविरुद्ध यु.के (युनायटेड किंग्डम) येथील न्यायालयात खटलाही सुरू आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रवर्तन निदेशालय माझ्या विरुद्ध जी कारवाई करत आहे ती चुकीची आहे. बँकांनी त्वरित आपले १०० टक्के रक्कम वापस घ्यावी, अशी मी बँकांना विनंती करतो, असे मल्याने यु.के (युनायटेड किंगडम) येथील न्यायालयात सांगितले होते.

vijay malya petition in supreme court
विजय माल्या
author img

By

Published : Feb 18, 2020, 8:24 AM IST

Updated : Feb 18, 2020, 9:20 AM IST

नवी दिल्ली - प्रवर्तन निदेशालयाने फरार मद्य व्यवसायी आणि किंगफिशर एअरलाईन्सचे मालक विजय मल्ल्याची भारतातील संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. या विरुद्ध मल्ल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

विजय मल्ल्यावर देशातील विविध बँकांचे ९००० कोटींचे कर्ज आणि मनी लाँड्रिंगचे आरोप आहे. मल्ल्याच्या विरुद्ध यु.के (युनायटेड किंग्डम) येथील न्यायालयात खटलाही सुरू आहे. गेल्या चार वर्षापासून प्रवर्तन निदेशालय माझ्या विरुद्ध जी कारवाई करत आहे ती चुकीची आहे. बँकांनी त्वरित आपले १०० टक्के रक्कम वापस घ्यावी अशी मी बँकांना विनंती करतो, असे मल्ल्याने यु.के (युनायटेड किंगडम) येथील न्यायालयात सांगितले होते. मी बँकांना पैसे परत केले नाही, अशी तक्रार बँकांनी प्रवर्तन निदेशालयाला केली होती. त्या आधारावर प्रवर्तन निदेशालयाने माझी संपत्ती सलग्न केली आहे. अस्थायी संलग्न निर्देशांमध्ये सांगितल्या प्रमाणे मी पीएमएलए अंतर्गत कुठलाही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे, प्रवर्तन निदेशालय स्वताहून माझी संपत्ती संलग्न करू शकत नाही. आता मी बँकांना त्यांचे पैसे परत घेण्याचे म्हणतो आहे. मात्र, प्रवर्तन निदेशालय माझ्या संपत्तीवर आपले हक्क असल्याचा दावा करत आहे, असे मल्याने गुरुवारी सांगितले होते. आता सर्वोच्च न्यायालय विजय मल्ल्याने संपत्ती प्रश्नबाबत सुनावणी करणार आहे. त्यामुळे, त्याच्या संपत्तीचे नेमके काय होणार हे पाहाण्याजोगे असणार आहे.

हेही वाचा- कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पांनी केला भारतीय 'उसेन बोल्ट'चा सत्कार

Last Updated : Feb 18, 2020, 9:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.