नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर रविवारी काश्मीरमधील श्रीनगर सचिवालयाच्या इमारतीवरील जम्मू काश्मीर राज्याचा झेंडा हटवून फक्त भारतीय तिरंगा ध्वज फडकवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत दोन्ही झेंडे सोबत फडकत होते.
-
#JammuAndKashmir: State flag removed from Civil Secretariat building in SRINAGAR, only tricolor seen atop the building. pic.twitter.com/bwo6bOMNZi
— ANI (@ANI) August 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#JammuAndKashmir: State flag removed from Civil Secretariat building in SRINAGAR, only tricolor seen atop the building. pic.twitter.com/bwo6bOMNZi
— ANI (@ANI) August 25, 2019#JammuAndKashmir: State flag removed from Civil Secretariat building in SRINAGAR, only tricolor seen atop the building. pic.twitter.com/bwo6bOMNZi
— ANI (@ANI) August 25, 2019
जम्मू काश्मीरचे आपले एक वेगळे सविंधान, झेंडा आणि दंडसंहिता होती. मात्र कलम 370 हटवल्यानंतर तेथे भारतीय सविंधान लागू झाले आहे. त्यामुळे तेथील सर्व सरकारी कार्यालयावर तिरंगा फडकणार असून भारतीय दंड संहिता लागू होणार आहे. यापूर्वी राज्याबाहेरील लोकांना काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याची परवानगी नव्हती. मात्र कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरचे स्वरूप बदलले आहे.
३७० कलम रद्द केल्यानंतर राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सरकारकडून 35 हजारांपेक्षा जास्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.