हैदराबाद - दक्षिणेकडील काही राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. आंध्र प्रदेशमधील नद्या आणि जलाशय भरली आहेत. त्यामुळे श्रीशैलम धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणामधून पाण्याचा विसर्ग होतानाचे मनमोहक दृश्य सध्या पाहायला मिळत आहे.
धरणातून कृष्णा नदीत होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे अद्भुत दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आले आहे. येथील मनमोहक आणि प्रशंसनीय निसर्गरम्य देखावा पर्यटकांना भुरळ घालत आहे.