हैदराबाद - पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आता विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. महबूबनगर जिल्हा न्यायालयात हे विशेष न्यायालया स्थापन करण्यात आले आहे. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) आता चालणार असून लवकरच याचा निकाल येणे अपेक्षित आहे.
-
Telangana: A Special Court to be setup at Mahabubnagar District Court to hear the case of rape and murder of a woman veterinarian. pic.twitter.com/K5aORaZk3w
— ANI (@ANI) December 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Telangana: A Special Court to be setup at Mahabubnagar District Court to hear the case of rape and murder of a woman veterinarian. pic.twitter.com/K5aORaZk3w
— ANI (@ANI) December 4, 2019Telangana: A Special Court to be setup at Mahabubnagar District Court to hear the case of rape and murder of a woman veterinarian. pic.twitter.com/K5aORaZk3w
— ANI (@ANI) December 4, 2019
याआधी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी याप्रकरणासाठी जलदगती न्यायालयात हा खटला चालवला जाणार असल्याची माहिती दिली होती.
हैदराबाद येथे 27 नोव्हेंबरला महिला डॉक्टरवर बलात्कारनंतर हत्या करून तिला जाळण्यात आले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी अनेक शहरांमध्ये आंदोलने करण्यात आली.