ETV Bharat / bharat

COVID19 : सोनिया गांधींनी बोलावली विरोधी पक्षांची बैठक; बसप, आप दांडी मारण्याची शक्यता - सोनिया गांधी विरोधी पक्ष बैठक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशातील सर्व विरोधी पक्ष नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचे प्रमुख अनुपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसमध्ये नव्याने सामील झालेले शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Sonia Gandhi
सोनिया गांधी
author img

By

Published : May 22, 2020, 10:00 AM IST

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज देशातील सर्व विरोधी पक्ष नेत्यांची बैठक बोलावली आहे. सोनिया गांधी व्हिडिओ कॉन्फरन्स‍िंगच्या माध्यमातून ही बैठक आज दुपारी ३ वाजता घेणार आहेत. या बैठकीला आम आदमी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचे प्रमुख अनुपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. समाजवादी पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

लॉकडाऊनमध्ये काँग्रेसने उत्तर प्रदेशला येणाऱ्या कामगारांसाठी बस पाठवल्या होत्या, ही बाब बसपा अध्यक्ष मायावती यांना रुचली नाही. तर मायावती यांनी पंजाबमध्ये असलेल्या उत्तर प्रदेशातील कामगारांसाठी बसची व्यवस्था करावी, असे काँग्रेसने सांगितले होते. मात्र, मायावतींने ते मान्य केले नाही. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण आहे. तर आप आणि काँग्रेसचे दिल्लीत संबध ताणलेले आहेत.

काँग्रेसमध्ये नव्याने सामील झालेले शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चर्चेत सहभागी होतील. या बैठकीत कोरोना, लॉकडाऊन आणि स्थलांतरित मजूरांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली जाणार आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, माकप नेते सीताराम येचूरी, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, द्रमुकनेते एम.के.स्टॅलिन, पीआरपीचे नेते जोगेंद्र कवाडे आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र शासनावर जोरदार टीका केली. शासनाने संसदेला बाजूला सारले असून त्यांच्या लेखी संसदचे काही महत्त्व नाही, असे दिसते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.