ETV Bharat / bharat

आठ वर्ष झाले नव्हते मुल; म्हणून चेन्नईच्या 'या' अण्णाने तब्बल ४५ एचआयव्हीग्रस्त मुलं घेतली दत्तक

शेल्टर ट्रस्टद्वारे या मुलांना प्रत्येक सुविधा पुरवली जाते. यामध्ये शिक्षण, वैद्यकीय सुविधा, खेळणी, कला, डान्स आणि कॉम्प्युटरचे ज्ञान दिले जाते.

सोलोमन राज यांच्यासोबत एचआयव्हीग्रस्त मुले
author img

By

Published : Jun 9, 2019, 7:11 PM IST

Updated : Jun 9, 2019, 7:30 PM IST

चेन्नई - शहरातील 'शेल्टर ट्रस्ट' या संस्थेने घरच्यांनी सोडून दिलेल्या एचआयव्हीग्रस्त मुलांना निवारा देत आदर्श निर्माण केला आहे. सोलोमन राज (अप्पा) यांनी ४५ एचआयव्ही मुलांना निवारा दिला आहे.

सोलोमन राज यांनी 'शेल्टर ट्रस्ट' उपक्रमाबाबत म्हणाले, चांगले काम केल्यामुळे मला समाधान मिळते. ही लहान मुले मला 'अप्पा' म्हणून हाक मारताना जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो. लग्न झाल्यापासून आम्हाला ८ वर्षापर्यंत मुल झाले नव्हते. त्यामुळे आम्ही गरजु असलेल्या एचआयव्ही बाधित मुलाला दत्तक घ्यायचे ठरवले. परंतु, आम्हांला बायोलॉजिकल मुल झाले. यामुळे, दत्तक मुल घेण्याचा विचार काही काळ बाजूला पडला. परंतु, एचआयव्हीग्रस्त मुलाला दत्तक घेतले नाही याचा विचार बैचेन करत होता. त्यामुळे मी मुल दत्तक घेण्याचे ठरवले आणि हा उपक्रम असाच चालू आहे. सध्या मी ४५ एचआयव्हीग्रस्त मुलांचा वडील आहे. यासाठी खूप आर्थिक अडचणी आहेत. यामध्ये त्यांचे शिक्षण आणि आरोग्यावर मोठा खर्च होतो. त्यांची तब्येत खराब असते. ते कधीही आजारी पडतात. परंतु, त्यांनी अप्पा म्हणून हाक मारल्यानंतर मला समाधान मिळते.

hiv childs
एचआयव्हीग्रस्त मुले शिक्षण घेताना

शेल्टर ट्रस्टद्वारे या मुलांना प्रत्येक सुविधा पुरवली जाते. यामध्ये शिक्षण, वैद्यकीय सुविधा, खेळणी, कला, डान्स आणि कॉम्प्युटरचे ज्ञान दिले जाते. या मुलांपैकी काहीजणांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. अकरावीत शिकणारी मुलगी म्हणाली, मी येथे २०१६ साली आले. मला डॉक्टर व्हायचे आहे. एचआयव्हीग्रस्त मुले इतर मुलांपेक्षा कमी नाहीत हे मला दाखवून द्यायचे आहे.

Intro:Body:

Nat 05

Conclusion:
Last Updated : Jun 9, 2019, 7:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.