कुल्लू (हिमाचल प्रदेश) - लाहौल-स्पीती आणि कुल्लू मनालीच्या डोंगराळ भागात रविवारी जोरदार बर्फवृष्टी झाली. यामुळे रोहतांग व बारालाचासह घाटी परिसरात निसर्गाने अगदी मुक्त हस्ताने शुभ्र उधळण केली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सद्या परिसरातील डोंगरावर बर्फांची पांढरी शुभ्र चादर दिसत आहे.
डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत असल्याने परिसरात थंडीची लाट पसरली आहे. केलांगमधील 'लेडी ऑफ केलांग' या डोंगरी भागावर बर्फाची पांढरी शुभ्र चादर पाहायला मिळत आहे. शिकुलासह, घेपन पीक, कोकसर जोत, बारालाचा, कुंजम, लहान व मोठा शिगडी ग्लेशियर, दारचा येथील डोंगर, नीलकंठ जोतसह परिसरातील डोंगराळ भाग बर्फमय झाला आहे.
बर्फवृष्टीमुळे पर्यटन व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण मागील अनेक महिन्यांपासून पर्यटन बंद आहे. यामुळे पर्यटनावर निघडीत असलेले व्यवसायावर मंदीचे सावट आहे. पण आता बर्फवृष्टी झाल्याने, पर्यटक कुल्लू मनालीकडे येतील आणि पर्यटन पुन्हा सुरू होईल, असे व्यवसायिकांची आशा आहे.
हेही वाचा - कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला ओडिशामध्ये सुरुवात
हेही वाचा - बिहार निवडणूक : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सभेत कार्यकर्त्यांनी दिल्या 'नितीश मुर्दाबाद'च्या घोषणा