ETV Bharat / bharat

स्मृती इराणी- 2004 मध्ये बीए, 2014 मध्ये बीकॉम, आता पदवीच नाही; कॉंग्रेसचा जोरदार हल्लाबोल - ग्रॅज्युएट स्मृती

स्मृती इराणी यांदाची लोकसभा निवडणूक मागचाच लोकसभा मतदार संघ म्हणजे अमेठीतून लढत आहेत. त्यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान त्यांच्या शपथपत्रामध्ये आपण १२वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे, असे नमूद केले आहे.

स्मृती इराणी (संग्रहित छायाचित्र)
author img

By

Published : Apr 12, 2019, 1:53 PM IST

Updated : Apr 12, 2019, 4:04 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या शिक्षणाचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अमेठी येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून काँग्रेसने त्यांना फैलावर घेतले. इतकेच नाही तर, त्यांच्या सततच्या बदलणाऱ्या शैक्षणिक पात्रतेवर त्यांनी गाणेही रचून टाकले आहे.

स्मृती इराणी यांदाची लोकसभा निवडणूक मागचाच लोकसभा मतदार संघ म्हणजे अमेठीतून लढत आहेत. त्यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान त्यांच्या शपथपत्रामध्ये आपण १२वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे, असे नमूद केले आहे. यापूर्वी २०१४च्या निवडणूकांमध्ये पदवीधर असल्याचे शैक्षणिक पात्रतेत नमूद केले होते. त्यावरुन काँग्रेसने चक्क पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर लिहिलेले गाणे गायले.

  • #WATCH Congress' Priyanka Chaturdevi: A new serial is going to come, 'Kyunki Mantri Bhi Kabhi Graduate Thi'; Its opening line will be 'Qualifications ke bhi roop badalte hain, naye-naye sanche mein dhalte hain, ek degree aati hai, ek degree jaati hai, bante affidavit naye hain. pic.twitter.com/o8My3RX9JR

    — ANI (@ANI) April 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेस प्रवक्ता प्रियांका चतुर्वेदी यांनी 'क्योंकि सास भी कभी बहू थीं' या इराणी यांच्या मालिकेच्या गाण्यावरुनच नवे गाणे बनवले आहे. 'क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅज्युएट थी' असे ते गाणे आहे. एक नवी मालिका आता आपल्यासमोर येणार आहे. क्योंकि मंत्री बी कभी ग्रॅजुएट थी. त्या मालिकेची शुरुवात ज्या गाण्यापासून होईल ते वरील गाणे आहे, असे चतुर्वेदी यांनी म्हटले.

स्मृती इराणी यांनी २००४, २०११, २०१४ मध्ये निवडणूक लढवताना दिलेल्या शपथपत्रांच्या प्रतिही चतुर्वेद्यी यांनी दाखवल्या पत्रकारांना दाखवल्या. इरानी यांनी अनेक वेळा विरोधी पक्षांच्या आरोपाला अमान्य करत आल्या आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. मात्र, त्या पूर्ण करण्यात इराणी असमर्थ ठरल्या. त्यावरुन विरोधी पक्ष त्यांना सतत फैलावर घेत असतो.

स्मृती इराणी यांनी २००४ आणि २०१४च्या निवडणुकांमध्ये पदवीचे शिक्षण घेतल्याचे नमूद केले होते. २००४मध्ये इराणी यांनी दिल्लीच्या चांदणी चौक येथून कपिल सिब्बल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी आपण कला शाखेत पदवी घेतली आहे, असे सांगितले होते. २०१४च्या निवडणुकांमध्ये त्यांनी आपण बीकॉम केल्याचे निवडणूक आयोगाला सांगितले. तर, यंदा त्यांनी चक्क आपण केवळ १२वीचे शिक्षण घेतले, असे नमूद केले आहे. स्मृती इराणी यांच्यावर चुकीची शैक्षणिक पात्रता सांगितल्यावरुन दिल्लीच्या उच्च न्यायालायमध्ये गुन्हा दाखल आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 12, 2019, 4:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.