वाराणसी - महिलांवर विनयभंग आणि बलात्काराच्या घटना लक्षात घेता वाराणसीच्या अशोक विज्ञान संगणक विज्ञान संस्थेच्या दोन विद्यार्थ्यांनी स्मार्ट चाकू बनविला आहे. ही चाकू केवळ जागेवरच आपले रक्षण करण्यासाठी एक हत्यार म्हणून उपयोगात येणार नाही तर, आपल्या नातेवाईकांनाही आपण अडचणीत असल्याची सूचना देऊन सतर्क करेल. शालिनी आणि दीक्षा यांनी मिळून हा चाकू बनवला आहे.
शालिनी आणि दीक्षा यांनी सांगितले की, हा काही सामान्य चाकू नाही. त्यात एक सिम कार्ड ठेवले आहे. जेणेकरून अडचणीत अडकलेल्या महिला गुन्हेगारांपासून स्वत:चे संरक्षण करण्यास सक्षम असतील. महिलेने हा चाकू बाहेर काढताच, आपण त्यात फीड केलेल्या 3 नंबरवर कॉल केला जाईल. हे डिव्हाइस रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि ब्लूटूथवर कार्य करते. या चाकूमध्ये एक लहानसे बटण आहे, जे रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे मोबाइल फोनशी संपर्कात राहते आणि हे बटण दाबताना मोबाईलमधील नंबरवर कॉल लावला जातो आणि अडचणीत सापडलेल्या महिलेचे लोकेशनही दाखवले जाते. कुटुंबीय आणि पोलीस मदतीसाठी येईपर्यंत ही महिला चाकूने स्वत:चा बचावही करू शकते. स्टीलपासून बनवलेल्या या चाकूचे वजन सुमारे 70 ग्रॅम आहे. हा चाकू तयार करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागला आणि त्यासाठी 1500 रुपये खर्च झाला.
हेही वाचा - मध्य प्रदेश : पती-पत्नीचा वाद, पाच वर्षीय मुलासह ९ जणांना पेटविले
या विद्यार्थिनींनी त्यांच्या विभागातील श्याम चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा डिव्हाईस तयार केला आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित अनेक वस्तू या वेळी बनवल्या जात आहेत. परंतु, या चाकूचा संरक्षण करणारे शस्त्र म्हणूनही वापर होऊ शकतो. सध्या याला प्रायोगिक तत्त्वावर बनवण्यात आले आहे.
अशोक इन्स्टिट्यूट वाराणसी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे प्रभारी श्याम चौरसिया म्हणाले की, स्मार्ट चाकूच्या माध्यमातून केवळ हल्लेखोराला धमकावलेच जात नाही तर, आजूबाजूच्या लोकांचे लक्षही वेधून घेता येते. तसेच, पोलिसांनाही बोलावले जाऊ शकते. ते म्हणाले की, यात मोठ्या आकाराच्या दागिन्यांमध्येही हा चाकू बसवतो येतो, जो लोकांचे लक्ष वेधून घेईल. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, हा ब्ल्यूटूथशी जोडण्यात आला आहे. याच्यामुळे अडचणीत असलेल्या मुलींचे संरक्षण होईल.
हेही वाचा - हाथरस प्रकरण : सीबीआयने पीडितेच्या भावांना बोलावले चौकशीसाठी