भोपाळ - मध्यप्रदेशचे शिवराजसिंह चौहान सरकार कोरोनाचा प्रसार कमी व्हावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. त्यातच सरकारच्या या कार्यात आपला खारीचा वाटा असावा, यासाठी धार जिल्ह्यातील महिमा मिश्रा या 6 वर्षीय मुलीने स्वतःला सायकल खरेदी करता यावी म्हणून जमा केलेली राशी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे.
हेही वाचा.... ओडिशामध्ये 'ओला' करणार अत्यावश्यक वाहतूक; रुग्णांसह डॉक्टर अन् वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही फायदा..
धार जिल्ह्यातील कुक्षी येथे राहणाणाऱ्या या 6 वर्षीय चिमुरडीने नक्कीच कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. महिमाने कोरोना विरूद्ध लढण्यासाठी आपल्या सायकलसाठी गोळा केलेली सर्व रक्कम मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दान केली आहे. यासाठी तीने मुख्यमंत्र्यांना तसे पत्र लिहिले आहे. तसेच हे पत्र तहसीलदारांजवळ दिले आहे.महिमा मिश्रा हिच्या या योगदानाचे कुक्षीच्या तहसीलदारांनीही कौतुक केले आहे.