ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशात भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, 10 जण गंभीर जखमी

author img

By

Published : Nov 2, 2020, 6:54 AM IST

Updated : Nov 2, 2020, 8:25 AM IST

पयागपूर शिवदाहा वळणावर अपघात झाला. या अपघातात सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे या मार्गावरिल वाहतूक ठप्प झाली होती.

six-people-died-and-many-injured-in-road-accident-in-bahraich
भीषण रोड अपघातात ६ जण जागीच ठार; यूपीच्या बहराइच जिल्ह्यातील घटना

बहराइच (उत्तर प्रदेश) - जिल्ह्यातील पयागपूर शिवदाहा वळणावर अपघात झाला. या अपघातात सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे या मार्गावरिल वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

देव दर्शनानंतर काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, १६ हून अधिक जण टाटा मॅजिक कारने किछौछा शरीफच्या दर्शनाला निघाले होते. दर्शनानंतर उशिरा रात्री परत निघाले होते. पयागपूर क्षेत्र परिसरात त्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जणाने उपचारादरम्यान प्राण सोडले.

जखमींवर उपचार सुरू

आपत्कालीन विभागाचे डॉक्टर विविक गुप्ता यांनी सांगितले की, हा अपघात रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला. यात अपघातातील ११ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला. १० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - दोन्ही राजकुमारांना हवा विनाश, केंद्रीय मंत्री अश्विनी चौबेंची राहुल, तेजस्वीवर अप्रत्यक्ष टीका

हेही वाचा - स्कॉर्पिओची ट्रकला धडक, ४ जण जिंवत जळाले, ३ गंभीर

Last Updated : Nov 2, 2020, 8:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.