बंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते सिद्धरामय्यांचे चिरंजीव यतिंद्र (वय 40) हे शुक्रवारी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. ही माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
यतिंद्र यांना कोरोनाचे कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आली नाहीत. तरीही ते टेस्ट केल्यानंतर बाधित असल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते प्रथमच वरुणा विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत.