मंडला - आज देशातील अनेक शहरे प्लास्टिकच्या विळख्यात अडकली आहे. प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक असून, आपण मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करत आहोत. अनेकजण प्लास्टिकमुक्तीसाठी प्रयत्न करत आहेत. मध्य प्रदेशमधील मंडला जिल्ह्यातील इंद्री गावच्या एका शिक्षकाने प्लास्टिकमुक्तीसाठी एक गाणे लिहले आहे. श्याम बैरागी असे त्या शिक्षकाचे नाव आहे. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी प्लास्टिकमुक्तीचा संदेश दिला आहे.
श्याम बैरागी हे पेशाने प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत. त्यांनी लिहिलेले 'गाडी वाला आया घर से कचरा निकल' हे गाणे सगळीकडे प्रसिद्ध झाले आहे. आपल्या गाण्यातून बैरागी यांनी प्लास्टिकच्या दुष्परिणामांची माहिती दिली आहे. तसेच प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहनही केले आहे. बैरागी यांच्या संगीत प्रवासाची सुरुवात प्रादेशिक भाषा आणि बोलीभाषांमधून झाली. आतापर्यंत त्यांनी 36 गाण्यांवर लेखन केले आहे.
प्लास्टिकमुळे होणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यापासूनच प्रेरित होऊन गायक आणि गीतकार श्याम बैरागी यांनी 'गाडी वाला आया घर से कचरा निकल' या गाणं लिहलं आणि त्याला आपला आवाजही दिला आहे. आपल्या गाण्यात प्लास्टिकची दुष्परिणाम सांगताना बैरागी यांनी लोकांना प्लास्टिकला कायमस्वरूपी निरोप घेण्याची विनंती केली आहे. त्यांचे हे गाणे सर्वसमावेशक असून सकाळी कचरा संग्रह करताना
प्रसिद्ध आहे.