ETV Bharat / bharat

गेहलोत यांनी घेतली आमदारांची बैठक, म्हणाले...विधानसभेत आपली एकजूट दाखवा - काँग्रेसचे नेते सचिन पायलट

येत्या 14 ऑगस्टपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. आमदारांच्या बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी गेहलोत स्वत:ची स्थिती मजबूत करण्यात गुंतले आहेत. रविवारी त्यांनी जैसलमेर येथे ठेवलेल्या आमदारांची भेट घेतली आणि या राजकीय लढ्यात पक्षाच्या आमदारांना सभागृहात आपली एकजूट दाखवण्यास सांगितले.

राजस्थान
राजस्थान
author img

By

Published : Aug 10, 2020, 7:41 AM IST

जयपूर - काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यापासून राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार संकटात सापडले आहे. येत्या 14 ऑगस्टपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. आमदारांच्या बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी गेहलोत स्वत:ची स्थिती मजबूत करण्यात गुंतले आहेत. रविवारी त्यांनी जैसलमेर येथे ठेवलेल्या आमदारांची भेट घेतली आणि या राजकीय लढ्यात पक्षाच्या आमदारांना विधानसभेत आपली एकजूट दाखवण्यास सांगितले.

'आपण सर्व जण लोकशाही योद्धे असून हे राजकीय युद्ध जिंकणार आहोत. साडेतीन वर्षानंतर (विधानसभा) निवडणूकही पुन्हा आपणच जिंकू. तुम्ही आजपर्यंत जे ऐक्य दाखविले तेच ऐक्य तुम्हाला सभागृहात दाखवावे लागेल, असे गेहलोत आमदारांना संबोधीत करताना म्हणाले. काँग्रेसचे नेते अजय माकन, रणदीप सुरजेवाला आणि प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा हेही या बैठकीस उपस्थित होते.

स्वातंत्र्यानंतर आणि त्यापूर्वीपासून पक्षाच्या संघर्षाचा इतिहास आहे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश पांडे म्हणाले. तसेच त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय संकटात काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या अन्य पक्षांच्या आमदारांचे आभार मानले.

सचिन पायलट आणि त्यांच्याशी निष्ठावान आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यात राजकीय गदारोळ सुरू आहे. राजस्थानमध्ये लवकरच विधानसभेचं अधिवेशन होणार आहे. यामुळे तेथील सत्तासंघर्षाला आणखी धार आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.