ETV Bharat / bharat

घड्याळाचे बटन दाबले तरी मत कमळालाच, मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय - शरद पवार

author img

By

Published : May 9, 2019, 6:02 PM IST

निवडणुकीच्या काळात ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. गुजरात व हैदराबाद येथील काही ईव्हीएम मशिन्सची तपासणी केली असता घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय, त्यामुळे ईव्हीएम मशीन्सबाबत मला चिंता वाटते, असे शरद पवार यांनी सांगितले. ते सातारा येथे बोलत होते.

शरद पवार

सातारा - सातारा ईव्हीएम मशीनमध्ये घड्याळाचे बटन दाबल्यावर कमळाला मत मिळते, हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे मला या प्रक्रियेची काळजी वाटते. त्यामुळे ही प्रक्रिया किचकट आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. आज सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार

यावेळी ईव्हीएम यंत्राबाबत आपल्या वक्तव्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केल्याचा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ''माझ्या समोर हैदराबादच्या आणि गुजरातच्या काही लोकांनी मशीन ठेवली आणि म्हणाले दाबा बटन. मी घड्याळावर दाबलं आणि तिथे कमळावर गेलं, हे मी स्वतः पाहिलंय. सगळ्याच मशिनमध्ये असे असेल असं मी म्हणत नाही. हे मी पाहिलेलं आहे म्हणून मी त्याच्याबद्दलची काळजी व्यक्त केली. पुन्हा आम्ही न्यायालयामध्ये गेलो, पण तिथे आमचं म्हणणं न्यायालयाने मान्य केले नाही.''

हे सर्व मशीनमध्ये करता येईल की नाही हे सांगू शकत नाही. परंतु यावेळी मला स्वतःला काळजी वाटत आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो व 5 ऐवजी 50 टक्के मते मोजली जावी, अशी विनंती आम्ही केली. दुर्दैवाने आमची मागणी न्यायालयाने फेटाळली असे पवार यांनी यावेळी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमसोबत जोडलेल्या 50 टक्के व्हीव्हीपॅट यंत्रातील मतनोंदणीची पडताळणी करावी अशी मागणी करणारी विरोधी पक्षांची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. यामुळे विरोधी पक्षांना जोरदार दणका बसला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवार बोलत होते.

50 टक्के व्हीव्हीपॅट यंत्रातील मतमोजणीची पडताळणी केल्यास मतमोजणीच्या प्रक्रियेलाच विलंब लागण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट मत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने व्यक्त केले आणि 8 एप्रिल रोजी दिलेला आपला निर्णय कायम ठेवला.

Intro:सातारा: ईव्हीएम मशीन मध्ये घड्याळाचे बटन दाबल्यावर कमळाला मत मिळते, हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे मला या प्रक्रियेची काळजी वाटते. त्यामुळे ही प्रक्रिया किचकट आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Body:यावेळी ईव्हीएम यंत्राबाबत आपल्या वक्तव्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केल्याचा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले ईव्हीएम मशीन बाबत मला जास्त चिंता वाटत आहे. कारण हैदराबाद व गुजरात येथील तज्ञांनी मला ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करता येऊ शकतो हे प्रत्यक्षात दाखवले. मी स्वतः बटन दाबले तर कमळाची लाईट लागली हे पाहिले असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

हे सर्व मशीन मध्ये करता येईल की नाही हे सांगू शकत नाही. परंतु यावेळी मला स्वतःला काळजी वाटत आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो व 5 ऐवजी 50 टक्के मते मोजली जावी अशी विनंती आम्ही केली दुर्दैवाने आमची मागणी न्यायालयाने फेटाळली असे पवार यांनी यावेळी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.