विजय दिवस
आज विजय दिवस आहे. १९७१ सालच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. भारत-पाकिस्तान यांच्यात झालेले युद्ध १३ दिवस चालले. १६ डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या सेनेने बिनशर्त आत्मसर्मपन केले आणि युद्धाचा शेवट झाला. त्या वर्षापासून भारत आणि बांगलादेशमध्ये आजचा दिवस दरवर्षी 'विजय दिन' म्हणून साजरा केला जातो.
दिल्ली
केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. आज या आंदोलनाचा २१ वा दिवस आहे. आतापर्यंत या आंदोलनात २० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण अद्याप या प्रकरणात कोणताही तोडगा निघालेला नाही.
मुंबई -
बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेश्नन प्रकरणी एनसीबीकडून तपास केला जात आहे. या प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाल यांची पुन्हा चौकशी केली जाणार आहे. या चौकशीसाठी अर्जुन रामपाल याला आज सकाळी ११ वाजता बोलवण्यात आलं आहे.
मुंबई -
आज वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेस दुपारी २ वाजता सुरूवात होईल.
पुणे -
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद आज होणार आहे.
दिल्ली -
आज दिल्ली न्यायालयात, शहरातील स्पा उघडण्याच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दरम्यान, दिल्लीतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे स्पा बंद ठेवण्यात आलं होते. हे सुरू करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी होणार आहे.
गुजरात -
राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. याशिवाय त्याच्या अध्यक्षतेखाली आज एक कॅबिनेट बैठक देखील होणार आहे. या बैठकीत कोरोना लसीकरण, वितरण तसेच याचे बजेट यासंबंधीची चर्चा होणार आहे.
हिमाचल प्रदेश -
राज्यात सद्या बर्फ पडत आहे. लाखो पर्यटक या हंगामात पर्यटनासाठी येत असतात. या पर्यटकांसाठी आज कालका शिमला ट्रकवर 'विस्टा होम' ही खास रेल्वे सोडण्यात येणार आहे.
पश्चिम बंगाल -
आज कुच बिहार येथे एका रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या रॅलीला संबोधित करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
झारखंड -
राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज तीन विभागाचा आढावा घेतील. सोरेन आज नगरविकास, आयटी आणि ई प्रशासन तसेच परिवहन विभागाचा आढावा घेणार आहेत.