ETV Bharat / bharat

कर'नाटकचा' आज शेवटचा अंक?, विधानभवन व राजभवन परिसरात कडक बंदोबस्त - मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी

विश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने विधान भवन परिसरतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासाठी विधान भवन परिसर आणि राज भवन रोडवर पुरेशी सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे. सोबतच कर्नाटकातील बंडखोर आमदारांना विश्वासात घेत मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी म्हणाले, संसद भवानातील सत्राला उपस्थित राहून सर्वांना सांगा की, भाजप पक्ष कसा आहे आणि त्याने लोकशाहीच्या इमारतीला पोखरत तिचे पावित्र्य कसे नष्ट केले.

विश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने विधान भवन परिसरतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे
author img

By

Published : Jul 22, 2019, 12:41 PM IST

Updated : Jul 22, 2019, 2:25 PM IST

बंगरुळू - सोमवारी कर्नाटकातील काँग्रस आणि जेडीएस यांच्या युतीचे सरकार विश्वास प्रस्तावाच्या चाचणीला सामोरे जाणार आहे. यासाठी विधान भवन परिसरतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासाठी विधान भवन परिसर आणि राज भवन रोडवर पुरेशी सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे.
रविवारी भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आपआपल्या आमदारांच्या बैठका घेतल्या. सोबतच विश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने भाजपने सांसदीय बैठक बोलावली आहे. बंगरुळातील रामदा हॉटेल येथे थांबलेले भाजपच्या आमदारांना येथे योगा करतांना पाहण्यात आले आहे.

कर्नाटकातील बंडखोर आमदारांना विश्वासात घेत मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी म्हणाले, संसद भवानातील सत्राला उपस्थीत राहून सर्वांना सांगा की, भाजप पक्ष कसा आहे. आणि त्याने लोकशाहीच्या इमारतीला पोखरत तिचे पावित्र कसे नष्ट केले.
सोमवारी कर्नाटक विधान भवनात विश्वासप्रस्तावाची चाचणी होणार आहे. यावेळी विधान भवनात होणाऱ्या कामकाजाकडे सगळ्याचे लक्ष लागलेले आहे. भाजपने केलेल्या अनेक आरोप प्रत्यारोपानंतर सभापती के आर रमेश कुमार विश्वास प्रस्तावाच्यावेळी काय पावले उचलतात हे पाहण्यासारखे असेल.

शुक्रवारी राज्यपाल वाजूभाई वाला यांनी आखून दिलेल्या विश्वास प्रस्तावाच्या दोन सिमांची पुर्तता न झाल्याने, विधीमंडळाचे कामकाज तहकुब करण्यात आले होते. यानंतर मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यात त्यांनी राज्यपालांच्या निर्देशात न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लघन झाल्याचे म्हटले होते.

तर दुसऱ्याबाजूला, राज्यसभेत विश्वास प्रस्तावाची चाचणी सोमवारी ५ वाजेआधी पुर्ण करा, अशी मागणी कर्नाटकातील दोन अपक्ष आमदारांनी रविवारी उच्च न्यायालयात केली आहे.

१६ बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे १३ महिने जूने काँग्रस आणि जेडीएस यांच्या युतीचे सरकार जुलै महिन्याच्या सुरवातीला अल्पमतात आले आहे. यात काँग्रेसचे १३ आणि जेडीएसच्या ३ आमदारांचा समावेश आहे. २२५ आमदार असलेल्या राज्यसभेत बहुमतासाठी ११३ आमदारांची आवश्यकता असते.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 22, 2019, 2:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.