शिमला - कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. मात्र, तरीही काही अत्यावश्यक कारणांसाठी राज्य सरकारांनी प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, राज्यात येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोनाचा फैलाव होई नये, म्हणून हिमाचल प्रदेश सरकारने राज्यांच्या सीमांवर चाचणीची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
To regulate inter-state entries in Himachal Pradesh, it has been decided that screening centers will be established at all inter-state barriers on entry points. All those who are entering, will be tested with rapid diagnostic tests: State Additional Chief Secy (Health) #COVID19 pic.twitter.com/KH5UAgNvZw
— ANI (@ANI) April 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">To regulate inter-state entries in Himachal Pradesh, it has been decided that screening centers will be established at all inter-state barriers on entry points. All those who are entering, will be tested with rapid diagnostic tests: State Additional Chief Secy (Health) #COVID19 pic.twitter.com/KH5UAgNvZw
— ANI (@ANI) April 16, 2020To regulate inter-state entries in Himachal Pradesh, it has been decided that screening centers will be established at all inter-state barriers on entry points. All those who are entering, will be tested with rapid diagnostic tests: State Additional Chief Secy (Health) #COVID19 pic.twitter.com/KH5UAgNvZw
— ANI (@ANI) April 16, 2020
राज्यामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड डायग्नॉस्टिक टेस्टिंग करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी ही माहिती दिली. राज्यामध्ये प्रवेश होणाऱ्या सर्व ठिकाणी ही चाचणी केली जाणार आहे. राज्यामध्ये कोरोनाचा रुग्ण येऊ नये, म्हणून ही काळजी घेण्यात येत आहे.
देशात कोरोनाचे रुग्ण 13 हजार 380 झाले आहेत. यातील 1 हजार 489 जण पूर्णत बरे झाले आहेत. तर 414 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांमधील 10 हजार 477 अॅक्टीव्ह केसेस आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्याने भारतात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.