नवी दिल्ली - मुघल शासक बाबराने जे केले त्यावर आपले कोणतेही नियंत्रण नव्हते. आमचा संबंध वर्तमान परिस्थितीशी आहे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अयोध्या रामजन्मभूमी खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे वक्तव्य केले. हा खटला मध्यस्थाकडे सोपवायचा की नाही यावर न्यायालय उद्या निर्णय देणार आहे.
राम जन्मभूमीचा खटला सोडविण्यासाठी मध्यस्थाची मदत घ्यावी असा एक विचार आहे. पण, खटला मध्यस्थाकडे सोपविण्यासंबंधी न्यायालय उद्या आदेश देणार आहे. तसेच, न्यायालय फक्त वर्तमान परिस्थितीचाच विचार खटल्या दरम्यान करत आहे. इतिहासातील घडामोडीवर कोणतेही भाष्य करण्यास न्यायालयाने नकार दिला.
न्यायालयाने सांगितले, की हा खटला केवळ जमिनीशी संबंधित नाही तर लोकांच्या धार्मिक भावनाही यात गुंतलेल्या आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले, की त्यांना या खटल्यामुळे लोकभावना आणि देशाच्या राजकारणावर होणाऱ्या परिणामाची पूर्ण कल्पना आहे.