ETV Bharat / bharat

सॅम पित्रोदा चुकीचे बोलले, त्यांनी जाहीर माफी मागावी - राहुल गांधी - congress

याआधी काँग्रेस पक्षाने पत्रक जारी करत 'हे पित्रोदा यांचे वैयक्तित मत असून पक्षाशी त्याचे काही देणे-घेणे नाही,' असे सांगत हात वर केले होते. मात्र, हा वाद निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत.

राहुल गांधी
author img

By

Published : May 13, 2019, 5:42 PM IST

फतेहगढ - पंजाबमधील फतेहगढ साहिब येथील सबेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'सॅम पित्रोदा चुकीचे बोलले. त्यांनी जाहीर माफी मागावी,' असे म्हटले आहे. '१९८४ च्या दंगल घडून गेली. जे झाले ते झाले. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आता का बोलत आहेत? मागील पाच वर्षात त्यांनी काय केले हे देशाला सांगावे,' असे वक्तव्य पित्रोदा यांनी केले होते.

पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. याआधी काँग्रेस पक्षाने पत्रक जारी करत 'हे पित्रोदा यांचे वैयक्तित मत असून पक्षाशी त्याचे काही देणे-घेणे नाही,' असे सांगत हात वर केले होते. मात्र, हा वाद निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यात विरोधी भाजपनेही याचे भांडवल करण्यास सुरुवात केले आहे. यानंतर राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये बोलताना 'सॅम पित्रोदा १९८४च्या दंगलीबाबत अतिशय चुकीचे बोलले. यासाठी त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. हे मी त्यांना फोनवरही सांगितले आहे. मी त्यांना सांगितले की, ते चुकले. त्यांनी या वक्तव्यासाठी शरमिंदा असल्याचे सांगून जाहीर माफी मागितली पाहिजे.'

हे पक्षाचे मत नाही - काँग्रेसचे जाहीर पत्रक

‘१९८४ दंगलीतील पीडितांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचा पाठिंबा कायम आहे. याविरोधात सॅम पित्रोदा अथवा कोणीही व्यक्त केलेले मत किंवा वक्तव्य हे काँग्रेस पक्षाचे मत नाही. १९८४ दंगल पीडितांना आणि २००२ गुजरात दंगल पीडितांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. कोणत्याही प्रकारच्या, कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेविरोधात त्यांच्या धर्म, रंगाच्या आधारे करण्यात आलेल्या हिंसाचाराला आमचा विरोध आहे’, असे पत्रक याआधी काँग्रेसने जारी केले होते.

काय म्हणाले होते सॅम पित्रोदा?

१९८४ च्या दंगलीचे आदेश त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाकडून आले होते असा आरोप भाजपने केला आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता सॅम पित्रोदा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. १९८४ ची दंगल घडून गेली. जे झाले ते झाले. १९८४ च्या दंगलीत पंतप्रधान कार्यालयाकडून काही आदेश देण्यात आले होते, असे मला अजिबात वाटत नाही. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आता का बोलत आहेत? मागील पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केले हे देशाला सांगावे.

Intro:Body:

सॅम पित्रोदा चुकीचे बोलले, त्यांनी जाहीर माफी मागावी - राहुल गांधी

‘१९८४ दंगलीतील पीडितांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचा पाठिंबा कायम आहे. याविरोधात सॅम पित्रोडा अथवा कोणीही व्यक्त केलेले मत किंवा वक्तव्य हे काँग्रेस पक्षाचे मत नाही. १९८४ दंगल पीडितांना आणि २००२ गुजरात दंगल पीडितांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. कोणत्याही प्रकारच्या, कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेविरोधात त्यांच्या धर्म, रंगाच्या आधारे करण्यात आलेल्या हिंसाचाराला आमचा विरोध आहे’, असे पत्रक याआधी काँग्रेसने जारी केले होते.

काय म्हणाले होते सॅम पित्रोदा?

१९८४ च्या दंगलीचे आदेश त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाकडून आले होते असा आरोप भाजपने केला आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता सॅम पित्रोदा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. १९८४ ची दंगल घडून गेली. जे झाले ते झाले.  १९८४ च्या दंगलीत पंतप्रधान कार्यालयाकडून काही आदेश देण्यात आले होते, असे मला अजिबात वाटत नाही. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आता का बोलत आहेत? मागील पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केले हे देशाला सांगावे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.