ETV Bharat / bharat

VIDEO : 'पप्पा आम्हाला शांततेत जगू द्या', आंतरजातीय विवाह केलेल्या भाजप आमदाराच्या मुलीची विनंती - आमदार

भाजप आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्राने घरच्यांच्या विरोधात जाऊन दलित मुलासोबत विवाह केला आहे. यामुळे वडील, भाऊ आणि नातेवाईक मला आणि माझ्या पतीला मारण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप साक्षीने केला आहे. वाचा सविस्तर...

साक्षी मिश्रा आणि अजितेश कुमार
author img

By

Published : Jul 11, 2019, 5:24 PM IST

Updated : Jul 11, 2019, 6:00 PM IST

नवी दिल्ली - भाजप आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्राने घरच्यांच्या विरोधात जाऊन दलित मुलासोबत विवाह केला आहे. यानंतर, साक्षी घर सोडून पळून गेली आहे. या घटनेनंतर साक्षीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये साक्षीने पोलिसांनी आवाहन करताना म्हटले आहे, की माझ्या वडिलांकडून माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आम्हाल सुरक्षा देण्यात यावी.

व्हायरल व्हिडिओ

बरेली जिल्ह्यातील बिथरी चैनपूर येथून आमदार असलेले राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल यांची मुलगी साक्षीने दलित युवक अजितेश कुमार याच्यासोबत हिंदू रितीरिवाजानुसार विवाह केला होता. या विवाहाचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल करण्यात आला होता. यानंतर, अजून एक व्हिडिओ पोस्ट करताना साक्षीने वडील राजेश मिश्रा, भाऊ विक्की आणि एका सहकाऱ्याकडून जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. हे सर्वजण मिळून माझी आणि माझ्या पतीची हत्या करू पाहत आहेत. यामुळे मला आणि माझ्या पतीला पोलिसांनी सुरक्षा द्यावी. यासोबतच बरेलीतील खासदार, आमदार आणि मंत्र्यांनी माझ्या वडिलांना मदत करू नये, असे आवाहन तिने केले होते.

तुमच्यामुळे आम्हाला त्रास होत आहे. आमच्या दोघांचा जीव धोक्यात आहे. अभी आणि त्याच्या परिवाराला त्रास देऊ नका. त्यांचा काही दोष नाही. हा निर्णय माझा आहे. मला स्वतंत्र आणि मुक्तपणे जगायचे आहे. प्लीज हे सर्व बंद करा, असेही साक्षीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

बरेलीचे पोलीस आयुक्त आर. के पांडे यांनी माहिती देताना सांगितले, की साक्षीने दलित युवकाशी केलेला विवाहाचा व्हिडिओ आम्ही बघितला आहे. त्यांना सुरक्षा देण्याची सुचना देण्यात आल्या आहेत. परंतु, दोघे सध्या कोठे आहेत याचा अद्याप आम्हाला पत्ता नाही. त्यामुळे पोलीस कोठे पाठवायचे याबाबत आम्हाला माहिती नाही.

rajesh mishra
राजेश मिश्रा यांचे स्पष्टीकरण

माध्यमात चालू असलेल्या बातम्या खोट्या आहेत. मी कोणालाही जिवे मारण्याची धमकी दिली नाही. साक्षीला तिचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. तिच्या जीवाला मी, माझा मुलगा आणि परिवारातील कोणत्याही सदस्याकडून धोका नाही. आम्ही कामात व्यस्त आहोत. साक्षी आनंदी राहावी, अशीच आमची इच्छा आहे, असे भाजप नेते राजेश मिश्रा यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले आहे.

अजितेश कुमारचे वडील हरिश कुमार यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे, की दोन्ही परिवार एकमेकांना ओळखतात. परंतु, त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. व्हिडिओमध्ये दोघेजण धमकी देणाऱ्यांची नावे घेताना दिसत आहेत. बरेली पोलीस आयुक्तांकडे मी विवाहाचे प्रमाणपत्र आणि अर्ज पाठवला आहे आणि यासंबंधी आता माध्यमांनाही माहिती दिली आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 11, 2019, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.