ETV Bharat / bharat

पक्षासाठी, सरकारसाठी काम करणाऱ्यांची बाजू ऐकून घ्यावी - सचिन पायलट - सचिन पायलट पत्रकार परिषद

कोणत्याही नेत्याबाबत वैयक्तिक अडचण नसून कोणाचाही द्वेष करत नाही. मात्र, काँग्रेस पक्षासाठी सरकारसाठी काम केलेल्या तळागळातील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे एकूण घेतले पाहिजे, असे पायलट म्हणाले.

सचिन पायलट
सचिन पायलट
author img

By

Published : Aug 11, 2020, 6:43 PM IST

जयपूर - राजस्थानात मागील काही दिवसांपासून सत्तासंघर्ष सुरु आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट आणि समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर गेहलोत सरकार अडचणीत आले आहे. आज सचिन पायलट यांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेवून आपली बाजू मांडली. काँग्रेस पक्षाने आमची बाजू ऐकून घेतली असून कमिटीच्या माध्यमातून आमच्या अडचणी सोडविल्या जातील, असे पायलट पत्रकार परिषदेत म्हणाले. कोणत्याही नेत्याबाबत वैयक्तिक अडचण नसून कोणाचाही द्वेष करत नाही. मात्र, काँग्रेस पक्षासाठी, सरकारसाठी काम केलेल्या तळागळातील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे एकूण घेतले पाहिजे, असे पायलट म्हणाले.

काय म्हणाले सचिन पायलट?

  • आमच्या अडचणी सोडविण्यासाठी एका कमिटीची काँग्रेसने स्थापना केली आहे. निर्णय घेण्याची, धोरणे बनविण्याची प्रक्रिया पारदर्शी करण्यात येईल.
  • सोनिया गांधी यांनी आपल्या अडचणी ऐकून घेतल्या
  • ज्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पाच वर्ष काम केले त्यांचे मत ऐकून घेतले पाहिजे
  • व्यक्तीगत कोणाचीही अडचण नाही, द्वेष नाही
  • पाच वर्ष ज्यांनी आंदोलन केले, पदयात्रा केल्या, निदर्शने केले, पक्षासाठी काम केले, तुरुंगात गेले त्यांना सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे
  • पारदर्शीपणे नेते, कार्यकर्ते यांना सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळावे
  • आमच्या निष्ठेवर शंका घेणाऱ्यांना उत्तर देणार
  • राजस्थानच्या मातीशी नातं...काम करत राहणार
  • कमिटीच्या माध्यमातून प्रश्न सोडविले जातील
  • अनेक नेत्यांच्या कष्टातून सरकारची निर्मिती
  • सर्वांना बरोबर घेवून चालण्याची माझी जबाबदारी. अडचणी सोडविण्याची जबाबदारी नेतृत्व करणाऱ्याची
  • लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
  • कोणाबद्दलही द्वेष किंवा नकारात्मक भावना नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.