ETV Bharat / bharat

केंद्र सरकारच्या निविदांमध्ये सहभागी होण्यास चिनी कंपन्यांवर बंदी घाला; स्वदेशी जागरण मंचची मागणी

भारत-चीनच्या सीमेवरील पूर्व लडाख येथील गलवान येथे सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीमध्ये भारताच्या तब्बल २० जवानांना वीरमरण आले. हुतात्मा जवानांना श्रद्धांजली म्हणून केंद्र सरकारच्या निविदांमध्ये चिनी कंपन्यांना सहभागी होण्यास बंदी घालावी, अशी मागणी स्वदेशी जागरण मंचने केली आहे.

SJM appeal people to boycott Chinese products
चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे स्वदेशी जागरण मंचचे आवाहन
author img

By

Published : Jun 17, 2020, 9:50 AM IST

Updated : Jun 17, 2020, 10:09 AM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या निविदांमध्ये चिनी कंपन्यांना सहभागी होण्यास बंदी घालण्यात यावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या स्वदेशी जागरण मंचने मंगळवारी केले आहे. हुतात्मा झालेल्या सैन्याच्या जवानांना श्रद्धांजली म्हणून जनतेने चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही मंचने केले आहे. भारत-चीनच्या सीमेवरील गलवान येथे सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली. यामध्ये भारताच्या तब्बल २० जवानांना वीरमरण आले आहे.

लोकांनी चिनी उत्पादने वापरणे बंद केली पाहिजेत. अभिनेता, क्रिकेटपटू आणि इतर सेलिब्रिटींनी चिनी उत्पादनांचा प्रचार करू नये, असे आवाहन स्वदेशी जागरण मंचचे सह-संयोजक अश्वनी महाजन यांनी केले.

भारत-चीनच्या सीमेवरील पूर्व लडाख येथील गलवान येथे सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीमध्ये भारताच्या तब्बल २० जवानांना वीरमरण आले. गेल्या पाच दशकातील दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेली ही मोठी झटापट आहे.

मंगळवारी पहिल्यांदा 1 कर्नल आणि 2 जवान हुतात्मा झाल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले होते. सायंकाळी आणखी 17 जण असे एकूण 20 जण हुतात्मा झाल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले.

Last Updated : Jun 17, 2020, 10:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.