नवी दिल्ली- फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेसने आपल्या सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत नवी दिल्ली मतदारसंघाचाही समावेश आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा हा मतदारसंघ असल्याने येथून काँग्रेस कोणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्लीमधून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने रोमेश सभरवाल यांना मैदानात उतरवले आहे. आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती. अरविंद केजरीवाल हे नवी दिल्लीमधून तर, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पटपडगंजमधून निवडणूक लढवणार आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी आठ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर, ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल.