नागाव - आसाममध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे ब्रम्हपुत्रा नदीला पूर आला आहे. त्यामुळे अनेक लोक स्थलांतर करत आहेत. अनेक गावांनी पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. या पुराच्या पाण्याने मोरीगावधील रस्ताच वाहून गेला आहे.
पुराच्या पाण्यामुळे आसामध्ये जवळपास १० लाखाच्या वर नागरिक बेघर झाले आहे. तसेच मागच्या ७२ तासामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रम्हपुत्रा आणि तिच्या उपनद्यांना आलेल्या पुरामुळे ३३ जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती आहे. राज्यातील १ हजार ८०० गावांना याचा फटका बसला आहे.