ETV Bharat / bharat

बिहार विधानसभा निवडणूक : तिकीट न मिळाल्यामुळे ढसाढसा रडला 'हा' नेता - bihar election update

आरजेडीचे रक्सौल विधानसभा मतदारसंघातील सुरेश यादव यांना निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र, त्यांना पक्षाकडून तिकीट देण्यात आले नाही. यावेळी माध्यमांशी बोलताना, ते अस्वस्थ झाले. त्यांचा ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

सुरेश यादव
सुरेश यादव
author img

By

Published : Oct 18, 2020, 1:36 PM IST

पाटणा - बिहारमधील निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. सर्व पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अशा परिस्थितीत असे काही नेते आहेत जे वर्षानुवर्षे निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते, परंतु पक्षाने त्यांना संधी दिली नाही. आरजेडीचे रक्सौल विधानसभा मतदारसंघातील सुरेश यादव यांना निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र, त्यांना पक्षाकडून तिकीट देण्यात आले नाही. यामुळे ते नाराज झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना, ते अस्वस्थ झाले. त्यांचा ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

भाजपविरोधात काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि डावे पक्षांनी एकत्र येत महागठबंधन केले आहे. यामुळे आरजेडीच्या काही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्या आहेत. यामुळे आरजेडीच्या काही नेत्यांना तिकीट मिळाले नाही. आरजेडीचे रक्सौल विधानसभा मतदारसंघातील जागा ही काँग्रेसच्या उमेदवाराला देण्यात आली आहे. सुरेश यादव यांनी महागठबंधनप्रती नाराजी व्यक्त केली. 19 ऑक्टोबरला ते आता रक्सौल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढणार आहेत. तर रक्सोलमधून काँग्रेसने रामबाबू यादव यांना तिकीट दिले आहे.

243 विधानसभा जागा असणार्‍या बिहारमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला मतदान होईल. निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होतील. कोरोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.