ETV Bharat / bharat

उत्तराखंडमध्ये पूरग्रस्तांना मदत घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ३ जणांचा मृत्यू - helicopter crashed

उत्तराखंड राज्यामध्ये पूरग्रस्तांना मदतकार्य सुरू असताना एक हेलिकॉप्टर उत्तरकाशी जिल्ह्यात कोसळले.

हेलिकॉप्टर कोसळले
author img

By

Published : Aug 21, 2019, 2:27 PM IST

डेहराडून - उत्तराखंड राज्यामध्ये पूरग्रस्तांना मदतकार्य सुरू असताना एक हेलिकॉप्टर उत्तरकाशी जिल्ह्यात कोसळले. मोरी येथून मोलदी येथे जाताना हे हेलिकॉप्टर डोंगराळ भागात कोसळले. या घटनेत पायलटसह तिघांचा मृत्यू झाला आहे. राज्यामध्ये पुराने थैमान घातले आहे. प्रशासनतर्फे पुरात अडकलेल्या लोकांना गरजेचे साहित्य पुरवण्यात येत आहे, त्यावेळी ही घटना घडली.

पायलट लालसह पायलट शैलशा आणि रमेश सरवान (स्थानिक) या तिघांचा मृत्यू झाला. उत्तराखंड राज्यामध्ये ढगफुटी झाली असून राज्य नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडले आहे. विजेच्या तारांमध्ये हेलिकॉप्टर अडकल्याने कोसळले. दुपारी १२.११ च्या दरम्यान ही घटना घडल्याचे चमोली पोलिसांनी ईटीव्हीशी भारतशी बोलताना सांगितले. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.