नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) अंतर्गत ग्राहकांसाठी बँकेच्या व्यवहाराचा वेळ वाढवला आहे. आता नवीन नियमानुसार, १ जूनपासून ग्राहकांना बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा व्यवहार करता येणार आहे.
याआधी ग्राहकांसाठी ४ वाजून ३० वाजेपर्यंतच बँकेत व्यवहार करता येत होते. यामुळे बँकेत जावून व्यवहार करणाऱ्या अनेक ग्राहकांची गैरसोय होत होती. आता नवीन नियमानुसार ६ वाजेपर्यंत व्यवहार करता येणार आहे. यामुळे ग्राहकांची व्यवहारासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे.