ETV Bharat / bharat

मुसळधार पावसानंतर तेलंगणात बचावकार्य अद्यापही सुरू, मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक - तेलंगणा पूर

मुख्यमंत्री के. सी राव यांनी पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवार) मंत्रिमंडळाची आणि उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सखल भागात साठलेले पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी दिली.

Relief operations
बचाव पथक
author img

By

Published : Oct 15, 2020, 4:00 PM IST

हैदराबाद : मंगळवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तेलंगणामध्ये तब्बल ३० लोकांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. यांपैकी १९ जण हे हैदराबादमधील आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पहायला मिळाला. हैदराबादमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. पुरग्रस्त भागात अद्यापही बचावकार्य सुरू असून शहरातील सखल भागातील पाणी ओसरलेले नाही.

मुख्यमंत्री के. सी राव यांनी पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज(गुरुवार) मंत्रिमंडळाची आणि उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सखल भागात साठलेले पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी दिली. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नागरिकांना दिलासा देण्याकरिता तेलंगणा सरकारच्या बचाव मोहिमेत एनडीआरएफच्या जवानांनीही सहभाग घेतला आहे. सैन्याने बंडलगौडा येथे बचाव मोहीम राबवली. तसेच, विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना सैन्याने सुरक्षित स्थळी हलवले. सैन्याच्या वैद्यकीय पथकाकडून जीवनावश्यक वस्तुंची मदतही अडकून पडलेल्या नागरिकांना देण्यात येत आहे.

बुधवारी हैदराबादमधील बंडलगुडा भागात भिंत कोसळल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले होते. तिघांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका घटनेत ईब्राहीमपट्टणम येथे घराची छत कोसळल्याने 40 वर्षीय महिला आणि तिच्या 15 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रमाणेच आणखी काही लोकांचा वाहून गेल्याने, तसेच विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमधील परिस्थितीकडे गृहमंत्रालयाचे लक्ष आहे, आणि मोदी सरकार लोकांची सर्वेतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी दिली. यासोबतच, पुराचा फटका बसलेल्या लोकांसाठी मी प्रार्थना करत असल्याचेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.