शिमला - दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र, अजूनही फाशीची अंमलबजावणी झाली नाही. यावरून हिमाचल प्रदेशमधील रवी कुमार या सामाजिक कार्यकर्त्याने आरोपींना फाशी देण्याची मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केली आहे. आरोपींना फाशी देण्यासाठी माझी जल्लाद म्हणून नेमणूक करावी, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे केली आहे.
हेही वाचा - INX मीडिया प्रकरण : अखेर १०६ दिवसानंतर पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगातून सुटका
देशात महिलांविरोधात क्रूर गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा झाली तरी अनेक दोषींना फाशी दिली जात नाही. दिल्लीतील तिहार तुरुंगामध्ये जल्लाद नसल्यामुळे दोषींना फाशी दिली जात नाही, असे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा - हैदराबाद महिला डॉक्टर अत्याचार व हत्या प्रकरण; सुनावणीसाठी विशेष न्यायालयाची स्थापना
निर्भयाच्या हत्येमागील दोषींना आपल्या हातांनी फाशी देता यावी म्हणून मला जल्लाद म्हणून नेमावे, अशी मागणी रवी कुमार यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. दोषींना फाशी होत नसल्याने त्यांचा गुन्हे करण्याचा आत्मविश्वास वाढत आहे. दररोज महिलांबरोबर निंदनीय अत्याचार घडत असल्यावरून रवी कुमार यांनी चिंता व्यक्त केली.