ETV Bharat / bharat

'... तर पाकिस्तानी नागरिकांनाही चीनमधून बाहेर काढू'

author img

By

Published : Feb 6, 2020, 9:16 PM IST

चीनमध्ये कोरोना विषाणुने थैमान घातले असून वुहानमध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यी अडकले आहेत.

'... तर पाकिस्तानी नागरिकांनाही चीनमधून बाहेर काढू'
'... तर पाकिस्तानी नागरिकांनाही चीनमधून बाहेर काढू'

नवी दिल्ली - नेहमची चीनची तळी उचलणाऱ्या पाकिस्तानची कोरोना व्हायरसमुळे चांगलीच गोची झाली आहे. चीनमध्ये कोरोना विषाणुने थैमान घातले असून वुहानमध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यी अडकले आहेत. भारताने आपल्या नागरिकांना परत आल्यानंतर पाकिस्तानी विद्यार्थांनी भारताला मदत मागितल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर आज पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला. 'यासंबधी पाकिस्तान सरकारचे आमच्याशी काही बोलणे झाले नसून तशी काही विनंती आल्यास विचार करु' असे रविश कुमार म्हणाले.

  • #WATCH Raveesh Kumar, MEA (Ministry of External Affairs) on video of Pakistani students in China asking for help from India: We have not received any request regarding it from Pakistan Government. But, if such a situation arises and we have resources then we will consider it. pic.twitter.com/3iSufILHqi

    — ANI (@ANI) February 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
'अद्याप तरी पाकिस्तान सरकारकडून याबाबत कोणतीही विनंती आली नाही. जर तशी काही विनंती आली तर, परिस्थिती आणि आपल्याकडील संसाधनाचा विचार करता, त्यावर आम्ही नक्कीच विचार करू' असे रविश कुमार म्हणाले. भारताने शनिवार आणि रविवारी दोन विमानांनी चीनच्या वुहानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशी परत आणले. यानंतर वुहानमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. 'लवकरच बांगलादेश सुद्धा आपल्या लोकांना चीनमधून बाहेर काढणार आहे. यानंतर फक्त आम्ही पाकिस्तानी येथे अडकून राहू. पाकिस्तान सरकारला लाज वाटायला हवी. त्यांनी भारताकडून काही शिकायला हवे', असे विद्यार्थी व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत. दरम्यान या बिकट परिस्थितीत आम्ही चीनसोबत ठामपणे उभे आहोत आणि त्यामुळे आम्ही आमच्या नागरिकांना वुहानमधून बाहेर काढणार नाही, असे पाकिस्तानी सरकारने म्हटले आहे. चीनमधील कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत ५६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २७ हजार नागरिक कोरोना विषाणूने बाधित झाले आहेत. भारताने हुबेई प्रांतात कोरोनाचा प्रभाव जास्त असल्याने तेथे अडकलेल्या ६४५ भारतीयांना हवाई मार्गाने माघारी आणले आहे. हे सर्व नागरिक सुखरुप असून कोणालाही कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Intro:Body:

 '... तर पाकिस्तानी नागरिकांनाही चीनमधून बाहेर काढू'

नवी दिल्ली -  नेहमची चीनची तळी उचलणाऱ्या पाकिस्तानची कोरोना व्हायरसमुळे चांगलीच गोची झाली आहे. चीनमध्ये कोरोना विषाणुने थैमान घातले असून वुहानमध्ये   पाकिस्तानी विद्यार्थ्यी अडकले आहेत. भारताने आपल्या नागरिकांना परत आल्यानंतर पाकिस्तानी विद्यार्थांनी भारताला मदत मागितल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर आज पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला. 'यासंबधी पाकिस्तान सरकारचे आमच्याशी काही बोलणे झाले नसून तसा काही विनंती आल्यास विचार करु' असे रविश कुमार म्हणाले.

'अद्याप तरी पाकिस्तान सरकारकडून याबाबत कोणतीही विनंती आली नाही. जर तशी काही विनंती आली तर, परिस्थिती आणि आपल्याकडील संसाधनाचा विचार करता, त्यावर आम्ही नक्कीच विचार करू' असे रविश कुमार म्हणाले.

भारताने शनिवार आणि रविवारी दोन विमानांनी चीनच्या वुहानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशी परत आणले. यानंतर वुहानमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे.  'लवकरच बांगलादेश सुद्धा आपल्या लोकांना चीनमधून बाहेर काढणार आहे. यानंतर फक्त आम्ही पाकिस्तानी येथे अडकून राहू. पाकिस्तान सरकारला लाज वाटायला हवी. त्यांनी भारताकडून काही शिकायला हवे', असे विद्यार्थी व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत. दरम्यान या बिकट परिस्थितीत आम्ही चीनसोबत ठामपणे उभे आहोत आणि त्यामुळे आम्ही आमच्या नागरिकांना वुहानमधून बाहेर काढणार नाही, असे पाकिस्तानी सरकारने म्हटले आहे.

चीनमधील कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत ५६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २७ हजार नागरिक कोरोना विषाणूने बाधित झाले आहेत. भारताने  हुबेई प्रांतात कोरोनाचा प्रभाव जास्त असल्याने तेथे अडकलेल्या ६४५ भारतीयांना हवाई मार्गाने माघारी आणले आहे. हे सर्व नागरिक सुखरुप असून कोणालाही कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.