ETV Bharat / bharat

राज्यसभा खासदार अमरसिंह यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वाहिली श्रद्धांजली

राजनाथ सिंह यांनी आज सकाळी अमरसिंह यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. अमरसिंह यांचे शनिवारी निधन झाले. त्यांचे वय 64 वर्ष होते.

Rajnath Sinh last tribute to amarsinh
राजनाथ सिंह यांनी अमरसिंह यांना आदरांजली
author img

By

Published : Aug 3, 2020, 2:16 PM IST

नवी दिल्ली- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि खासदार अमरसिंह यांचे पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. संरक्षण मंत्र्यांनी अमरसिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली. रविवारी सिंगापूरहुन विमानाने पार्थिव भारतात आणण्यात आले. त्यानंतर ते दिल्लीच्या छत्तरपूर येथील त्यांच्या घरी आणण्यात आले.

राजनाथ सिंह यांनी आज सकाळी अमरसिंह यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. अमरसिंह यांचे शनिवारी निधन झाले. त्यांचे वय 64 वर्ष होते. अमरसिंह राज्यसभा सदस्य होते ते उपचारासाठी ते सिंगापूरला गेले होते तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष असलेले एम. व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी अमरसिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. अमरसिंह एक सक्षम खासदार होते, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शनिवारी अमरसिंह याना श्रद्धांजली वाहिली. "अमरसिंहजी एक उत्साही सार्वजनिक व्यक्तिमत्त्व होते. गेल्या काही दशकात, त्यांनी मोठ्या राजकीय घडामोडी जवळून पाहिल्या. अनेक क्षेत्रातील व्यक्तींसोबत मित्रत्वासाठी ते परिचित होते. त्यांच्या निधनाने दुःख होत आहे. अमरसिंह आणि कुटुंबियांच्या आणि मित्रपरिवार दु: खात सहभागी आहे, ओम शांती, "असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी अमरसिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

प्रगतीशील समाजवादी पार्टीचे (लोहिया) नेते शिवपालसिंग यादव व इतरांनी समाजवादी पक्षाच्या माजी नेत्याला श्रद्धांजली वाहिली.

२०१३ मध्ये अमरसिंह यांचे मूत्रपिंड निकामी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात पत्नी पंकजा आणि जुळ्या मुली, असा परिवार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.