ETV Bharat / bharat

खळबळजनक : राजस्थानमधील जे. के लोन रुग्णालयात अर्भक मृत्यूंचा आकडा १०७ वर; केंद्रीय आरोग्य पथक दाखल - राजस्थान अर्भक मृत्यू बातमी

राजस्थानमधील जे. के लोन रुग्णालयात मागील एक महिन्यापासून १०७ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे एक पथक अर्भकांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 4, 2020, 2:16 PM IST

जयपूर - राजस्थानमधील जे. के लोन रुग्णालयात मागील एक महिन्यापासून अर्भकांचा मृत्यू होत आहे. आत्तापर्यंत १०७ अर्भकांचा मृत्यू झाल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला खडबडून जाग आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे एक पथक अर्भकांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहे.

जोधपूरमधील एम्स रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. कुलदीप सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पथक पाठवण्यात आले आहे. यामध्ये डॉ. हिमांशू, डॉ. अनिल, डॉ. वारिशा आणि अरुण सिंह यांचा समावेश आहे.

हे पथक रुग्णालयातील असुविधांबाबत अहवाल तयार करणार आहे. हा अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पाठवण्यात येणार आहे. पथक रुग्णालयातील अतिदक्षता विभागांचीही पाहणी करणार आहे. तसेच अर्भकांच्या मृत्यूमागच्या कारणांचा शोध घेणार आहे. कोटा येथील जे. के. लोन रुग्णालयात मागील एक महिन्यात १०७ मुलांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेली सर्व अर्भके पेडियाट्रीक आणि नियोनेटल विभागात ठेवण्यात आली होती.
राजस्थानमधील जेके लोन रुग्णालयात अर्भक मृत्यूंचा आकडा १०७ वर
जे. के. लोन रुग्णालयातील बालकांचा मृत्यूप्रकरणी सरकार संवेदनशील आहे. यावर राजकारण करू नये. या रुग्णालयातील बालकांच्या मृत्यूची संख्या कमी होत आहे. आम्ही बालकांचे मृत्यू आणखी कमी करण्याचा प्रयत्न करू. आई आणि बाळाचे आरोग्य निरोगी राहावे यालाच आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले आहेत. राजस्थानमध्ये सर्वप्रथम आम्ही बालकांसाठी ICU ची स्थापना केली होती. आमच्या सरकारच्या काळात ऑपरेशन थिएटर्समध्ये सुधारणा करण्यात आली आहे. बालकांचा मृत्यू दर घटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. निरोगी राजस्थान हीच आमची प्राथमिकता आहे, असेही गेहलोत म्हणाले मात्र, राजस्थानमध्ये याच्या विपरीत चित्र दिसत आहे.

Intro:Body:

खळबळजनक : राजस्थानमधील जेके लोन रुग्णालयात अर्भक मृत्यूंचा आकडा १०७ वर

जयपूर - राजस्थानमधील जे. के लोन रुग्णालयात मागील एक महिन्यापासून अर्भकांचा मृत्यू होत आहे. आत्तापर्यंत १०७ अर्भकांचा मृत्यू झाल्याने केंद्रिय आरोग्य मंत्रालयाला खडबडून जाग आली आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचे एक पथक अर्भकांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहे.      

जोधपूरमधील एम्स रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. कुलदीप सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पथक पाठवण्यात आले आहे. यामध्ये डॉ. हिमांशू, डॉ. अनिल, डॉ. वारिशा आणि अरुण सिंह यांचा समावेश आहे.

हे पथक रुग्णालयातील असुविधांबाबत अहवाल तयार करणार आहे. हा अहवाल केंद्रिय आरोग्य मंत्रालयाला पाठवण्यात येणार आहे. पथक रुग्णालयातील अतिदक्षता विभागांचीही पाहणी करणार आहे. तसेच अर्भकांच्या मृत्यूमागच्या कारणांचा शोध घेणार आहे. कोटा येथील जेके लोन रुग्णालयात मागील एक महिन्यात १०७ मुलांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेली सर्व अर्भके पेडियाट्रीक आणि नियोनेटल विभागात ठेवण्यात आली होती.   

जे. के. लोन रुग्णालयातील बालकांचा मृत्यूप्रकरणी सरकार संवेदनशील आहे. यावर राजकारण करू नये. या रुग्णालयातील बालकांच्या मृत्यूची संख्या कमी होत आहे. आम्ही बालकांचे मृत्यू आणखी कमी करण्याचा प्रयत्न करू. आई आणि बाळाचे आरोग्य निरोगी राहावे यालाच आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले आहेत.

राजस्थानमध्ये सर्वप्रथम आम्ही बालकांसाठी ICU ची स्थापना केली होती. आमच्या सरकारच्या काळात ऑपरेशन थिएटर्समध्ये सुधारणा करण्यात आली आहे. बालकांचा मृत्यू दर घटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. निरोगी राजस्थान हीच आमची प्राथमिकता आहे, असेही गेहलोत म्हणाले मात्र, राजस्थानमध्ये याच्या विपरीत चित्र दिसत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.