जयपुर - देशभरात कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे. यामुळेच सर्वत्र सॅनिटायझरची (जंतुनाशक) मागणी वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत साठेबाजी आणि वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्यांना अच्छे दिन येत आहे. याचे कारण काही विक्रेते स्वस्त सॅनिटायझर देखील महागड्या दराने विकत आहेत. त्यामळेच 23 मार्चपासून राजस्थानच्या गंगानगर येथील साखर कारखान्यात राजस्थान सरकारने सॅनिटायझर उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत या कारखान्यातून तयार झालेल्या सॅनिटायझरच्या 16 लाख बाटल्या राजस्थानच्या विविध भागात पुरविल्या गेल्या आहेत.
हेही वाचा... 'तबलिगी जमात'मधील रुग्णांचे वर्तन आक्षेपार्ह; गाझियाबाद रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचा आरोप..
जागतिक महामारी म्हणून उदयास आलेल्या कोरोना विषाणूमुळे देशभरात सॅनिटायझरच्या मागणीत तीव्र वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, कमी किमतींचे सॅनिटायझर देखील जास्तीच्या दराने विकले जात आहे. यामुळे राजस्थान सरकारने एक पाऊल उचलत स्वतः सॅनिटायझरची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा... 'तू कोरोना आहेस, घरातून चालती हो..!' लॉकडाऊन काळात घरगुती हिंसाचारात वाढ
जयपूर येथील अधिकाऱ्यांसोबत याबाबत बातचित केली असता त्यांनी, दिवसभरात सॅनिटायझरच्या सुमारे 70 हजार ते एक लाख बाटल्या तयार केल्या जात असल्याचे सांगितले. तसेच यांचे राज्यातील वेगवेगळ्या भागात दररोज विपणन देखील होत असल्याचे सांगितले.
कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी बाजारात अल्कोहोल (दारु) आधारित सॅनिटायझरचा वापर केला जातो आहे. कारखान्यातील अनेक तज्ञ सध्या याच उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहेत.