ETV Bharat / bharat

राजस्थानात कोरोनाग्रस्तांचा आकडा एक हजाराच्या पुढे

author img

By

Published : Apr 14, 2020, 10:52 PM IST

राज्यात 1 हजार 5 एकूण कोरोनाग्रस्त आहेत. यातील 133 जण बरे झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

जयपूर - राजस्थानात आज दिवसभरात 108 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यातील एकट्या जयपूर शहरात 83 रुग्ण आढळून आले आहेत. आज वाढलेल्या रुग्णांमुळे राजस्थानातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजारांच्या पुढे गेली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूत एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात तर 2 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. आता राजस्थाननेही हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात 1 हजार 5 एकूण कोरोनाग्रस्त आहेत. यातील 133 जण बरे झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.

देशभरात कोरोनाचे 10 हजार 815 रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत 1 हजार 190 जण पूर्णता बरे झाले असून 353 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 1 हजार 463 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 29 जण दगावले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.