ETV Bharat / bharat

कोरोना : राजस्थानने 'रॅपिड' टेस्टीगं थांबविल्या, कारण...

जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयातील डॉक्टारांनी सर्वात प्रथम रॅपिड टेस्टिंग किटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 1 हजार 232 नागरिकांची या किटद्वारे चाचणी घेण्यात आली, तेव्हा फक्त दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आले.

rapid testing kit
रॅपीड टेस्टिंग किट
author img

By

Published : Apr 21, 2020, 8:37 PM IST

Updated : Apr 21, 2020, 11:17 PM IST

जयपूर - राजस्थान सरकारने कोरोना चाचणी घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रॅपिड टेस्टिंग किटचा वापर थांबवला आहे. चाचणी घेताना अचूकता येत नसल्याने या किटचा वापर थांबविण्यात आला आहे. चाचणी घेताना 90 टक्के अचूकता येण्याची आवश्यकता असताना फक्त 5.4 टक्केच अचूकता येत आहे, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राजस्थाननं कोरोनाचं निदान करण्यासाठीच्या रॅपीड टेस्टीगं थांबवल्या

चाचणी घेताना 90 टक्के अचूकता येण्याची आवश्यकता असताना फक्त 5.4 टक्केच अचूकता येत आहे. हे प्रमाण शून्यच्या एकदम जवळचे आहे. अचूकता कमी असल्यामुळे हे किट वापरणार नसल्याचे आम्ही आयसीएमआरला पत्र लिहून कळविले आहे. आयसीएमआरच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत, असे राज्याचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयातील डॉक्टारांनी सर्वात प्रथम रॅपिड टेस्टिंग किटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 1 हजार 232 नागरिकांची या किटद्वारे चाचणी घेण्यात आली तेव्हा फक्त दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आले. मात्र, नंतर पॉलिमर चैन रिअ‌ॅक्शन किटद्वारे चाचणी करण्यात आली, तेव्हा या संशयितांमधील अनेक जण पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे रॅपीड टेस्टिंग किटचा वापर न करण्याचा राजस्थानने निर्णय घेतला.

सवाई मानसिंग रुग्णालयातील मायक्रोबायोलॉजी आणि प्रतिबंधात्मक औषधे विभागाच्या डॉक्टरांनीही रॅपीड टेस्टिंग किटची तपासणी केली आहे. त्याचा अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे. राजस्थान राज्याने सर्वात प्रथम रॅपीड टेस्टिंग किटचा वापर सुरू केला होता. लवकरच आणखी एक लाख किट सरकारला मिळणार होती. मात्र, अचूकता कमी येत असल्याने राज्याने चाचणी घेणे थांबविले आहे.

रॅपिड टेस्टिंग किटचा वापर थांबवा

रॅपीड टेस्टिंग कीटचा वापर दोन दिवस न करण्याचे निर्देश आयसीएमआरने राज्य सरकारांना केले आहे. लोकांमध्ये जाऊन नागरिकांची तपासणी करणाऱ्या पथकांकडून कीट कसे काम करते हे पाहण्यात येत आहे. आयसीएमआर दोन दिवसांत पुढील निर्देश जारी करेल, असे गंगाखेडकर यांनी सांगितले. रॅपीड टेस्टिंग कीटद्वारे चुकीचे आणि वेगवेगळे निष्कर्ष समोर येत आहे. या कारणामुळे राजस्थानने या चाचणी कीटचा वापर थांबवला आहे.

Last Updated : Apr 21, 2020, 11:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.