ETV Bharat / bharat

'मुख्यमंत्री गेहलोत आपल्या आमदारांना बकरी समजतात का?' - मुख्यमंत्री गेहलोत

भाजप राज्यातील काँग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. बाजारात बकरी खरेदी करतात, तसे आमदार खरेदी करू पाहत आहे, असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला होता. त्यावरून भाजप नेते सतिश पुनिया यांनी गेहलोत यांच्यावर पलटवार केला.

राजस्थान
राजस्थान
author img

By

Published : Jul 12, 2020, 12:29 PM IST

जयपूर - भाजप राज्यातील काँग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. बाजारात बकरी खरेदी करतात, तसे आमदार खरेदी करू पाहत आहे, असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला होता. त्यावरून भाजप नेते सतिश पुनिया यांनी गेहलोत यांच्यावर पलटवार केला. गेहलोत आपल्या आमदारांना बकरी समजतात का?, असा सवाल भाजपने पत्रकार परिषदेदरम्यान केला.

आपले मुख्यमंत्री फार पर्यायवरणप्रेमी आहेत. ते कधी घोडेबाजार, कधी हत्तीबाजाराविषयी बोलतात. आता तर ते बकरीबाजाराविषयी बोलत आहेत, हे निंदनीय आहे. अशा शब्दांचा वापर करून त्यांनी राज्यातील आमदारांचा अपमान केला आहे, असे पुनिया म्हणाले. गेहलोत यांचा त्यांच्याच आमदारांवर विश्वास नसल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री अशोक गहलोत हे एक धूर्त राजकारणी आहेत, ते कारभारात अपयशी ठरल्याबद्दल भाजपला दोष देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत, असेही पुनिया म्हणाले. आमदारांसाठी गद्दार (देशद्रोही) हा शब्द वापरल्याबद्दलही त्यांनी गहलोत यांच्यावर हल्ला केला.

"अशोक गहलोत हे आमदार खरेदीविषयी अफवा पसरवत आहेत, परंतु सत्य हे आहे की, त्यांना आपल्याच आमदारांवर विश्वास नाही. आम्ही सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहोत हा चुकीचा आरोप आहे, असे आरएलपीचे खासदार हनुमान बेनीवाल म्हणाले.

राजस्थान सरकार अस्थिर करण्याप्रकरणी अशोक सिंह आणि भरत मलानी या दोघांना शनिवारी एका विशेष ऑपरेशन ग्रुपने (एसओजी) अटक केली होती, अशी माहिती राजस्थानचे अतिरिक्त महासंचालक अशोक कुमार राठौर यांनी दिली. या दोघांची चौकशी केली जात असून त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, असे राठोड म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.