ETV Bharat / bharat

देशातील रेल्वे मार्गांचे साडेतीन वर्षात संपूर्ण विद्युतीकरण, तर 2030पर्यंत 'ग्रीन रेल्वे' - गोयल - रेल्वे विद्युतीकरण मिशन

भारतीय रेल्वेचे पुढील साडेतीन वर्षात 100 टक्के विद्युतीकरण होईल. तर पुढील 9 ते 10 वर्षात भारत 'नेट झिरो' ऑपरेटर असेल. 2030 पर्यंत भारतातील रेल्वे ग्रीन रेल्वे असेल. याचा सर्व भारतीयांना अभिमान असेल, असे पियुष गोयल म्हणाले.

पियुष गोयल
पियुष गोयल
author img

By

Published : Jul 16, 2020, 3:58 PM IST

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेचे पुढील साडेतीन वर्षात संपूर्णपणे विद्युतीकरण करण्यात येईल. तसेच 2030 सालापर्यंत 'ग्रीन रेल्वे' हे उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केला आहे. ‘कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’द्वारे व्हर्च्युअली आयोजित 'पुननिर्मितीक्षम ऊर्जा निर्मिती' या विषयावर ते बोलत होते.

यावेळी त्यांनी भारताने पुनर्निमिती उर्जा क्षेत्रात मिळवलेल्या यशाची माहिती दिली. भारत आंतरराष्ट्रीय सोलार ग्रीड तयार करण्यासाठी काम करत असून 'पुनर्निमितीक्षम ऊर्जा क्षेत्रातात भारत महत्त्वाची भूमिका निभावत आहे. भारतीय रेल्वेचे पुढील साडेतीन वर्षात 100 टक्के विद्युतीकरण होईल. तर पुढील 9 ते 10 वर्षात भारत 'नेट झिरो' ऑपरेटर असेल. 2030 पर्यंत भारतातील रेल्वे ग्रीन रेल्वे असेल. याचा सर्व भारतीयांना अभिमान असेल, असे पियुष गोयल म्हणाले.

2030पर्यंत ग्रीन रेल्वे बनविण्याचे मिशन सुरू करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेच्या 40 हजार किमी मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. त्यातील 18 हजार 605 कि. मी. मार्गांचे काम 2014 ते 20 या सालात पूर्ण झाले आहे. तर 2020-21 या वर्षात 7 हजार कि. मी. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. 2023पर्यंत सर्व ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण करण्याचे ध्येय ठेवण्यात आल्याचे गोयल यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.