नवी दिल्ली - राहुल गांधींनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासोबत साधलेला संवाद हा केवळ व्यर्थ आणि निकामी आहे, अशी टीका भाजप नेते गोपालकृष्ण अग्रवाल यांनी केली आहे.
नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या पैसै घेऊन फरार झाले तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. या काळात आरबीआयचे गव्हर्नर कोण होते, हा प्रश्न राहुल यांनी राजन यांना विचारायला हवा, असेही अग्रवाल म्हणाले.
राहुल गांधींनी ही संवादाची सिरीज सुरू केली आहे तर त्यांनी यावर उपाय शोधावा, असेही ते म्हणाले. अर्थव्यवस्थेबाबत मोदी सरकार सर्वांकडूनच सल्ले घेत असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.
काँग्रेस जमिनीवर काम करण्याऐवजी केवळ चर्चा करत बसते. ही वेळ घरात बसून लोकांना सल्ले देण्याची नाही. रघुराम राजनही असेच वागत आहेत. अनेक राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. राहुल यांचे सल्ले त्यांच्या राज्य सरकारांनी अंमलात आणायला हवेत, असेही अग्रवाल म्हणाले.