ETV Bharat / bharat

राहुल गांधी आणि प्रियांका गांधींची वाटचाल काँग्रेसच्या सॉफ्ट हिंदुत्वावर - मुख्यमंत्री पिनाराई विजयन - अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन

राजीव गांधी, नरसिंहराव यांच्या काळातही काँग्रेसची जी भूमिका होती ती अजूनही आहे. धर्मनिरपेक्षतेवर काँग्रेसची कोणतीही भूमिका नाही, त्यांची काही भूमिका असती तर देशाची परिस्थिती आता आहे तशी झाली नसती, असे केरळच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले. राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांची राम मंदिराबद्दलची भूमिका नवी नाही, ते काँग्रेसचे सॉफ्ट हिंदुत्व पुढे चालवत आहेत, असे त्यांनी अयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजनाच्या संदर्भात विचारले असता म्हटले.

Pinarayi Vijayan
मुख्यमंत्री पिनराई विजयन
author img

By

Published : Aug 6, 2020, 1:49 PM IST

तिरुवनंतपुरम - काँगेस पक्ष सॉफ्ट हिंदुत्वासाठी ओळखला जातो, असे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटले आहे. अयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजनावर प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या मतांमध्ये नवीन काही नाही, ते काँग्रेसच्या सॉफ्ट हिंदुत्वावर वाटचाल करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

राजीव गांधी, नरसिंहराव यांच्या काळातही काँग्रेसची जी भूमिका होती ती अजूनही आहे. धर्मनिरपेक्षतेवर काँग्रेसची कोणतीही भूमिका नाही, त्यांची काही भूमिका असती तर देशाची परिस्थिती आता आहे तशी झाली नसती, असे केरळच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले. राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांची राम मंदिराबद्दलची भूमिका नवी नाही, ते काँग्रेसचे सॉफ्ट हिंदुत्व पुढे चालवत आहेत, असे त्यांनी अयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजनाच्या संदर्भात विचारले असता म्हटले.

अयोध्येतील राम मंदिर बांधकामाबद्दल आमच्या पक्षाच्या पॉलिट ब्युरोने भूमिका स्पष्ट केली. अयोध्येत पूजा आणि प्रार्थना करण्यास काँग्रेसने परवानगी दिली. मशिदीत मूर्ती ठेवण्यास परवानगी देणे, कारसेवा करण्यास परवानगी देणे, बाबरी मशीद पाडली गेली हे सर्व काँग्रेसच्या काळातच झाले आहे. काँग्रेस आणि मुस्लीम लीग त्यावेळी सत्तेत होते. हा सर्व आपल्या इतिहासाचा भाग आहे, असेही ते म्हणाले आहेत.

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यावर अधिक चर्चा करण्यापेक्षा देशातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. कोरोनामुळे संकटात असणाऱ्या गरिबांना मदत करावी, असे पिनाराई विजयन यांनी म्हटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.