पाटणा - बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात पाटणा येथील न्यायालयाने राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने याप्रकरणात राहुल यांना जामीन मंजूर केला आहे.
राहुल गांधी यांनी कोलार, कर्नाटक येथे प्रचारादरम्यान सर्व घोटाळेबाजांची नावे मोदीच असतात, अशी टिप्पणी केली होती. राहुल गांधी यांना पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि आयपीएल घोटाळ्यातील ललित मोदी यांच्याद्वारे पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. परंतु, सुशील मोदी यांनी एप्रिल महिन्यात राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात पाटणा येथील न्यायालयात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता.
सुशील मोदींनी दाखल केलेल्या गुन्हाप्रकरणी आज (शनिवार) न्यायालयात दाखल झाले होते. न्यायालयाने याप्रकरणी राहुल यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयानंतर राहुल यांना मुझफ्फरपूर येथे जाऊन चमकी रोगामुळे आजारी असलेल्या मुलांची भेट घ्यायची होती. परंतु, जिल्हा प्रशासनाने राहुल यांना मुझफ्फरपूरला भेट घेण्याची परवानगी नाकारली.