नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस लाख कोटींच्या पॅकेजवर टीका केली आहे. मजूरांना कर्ज नको, त्यांना पैसे द्या, अशी मागणी गांधी यांनी केलीय. मोदी सरकार इतर देशांकडे बघून आपल्या देशासाठी निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले. यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या पॅकेजचा पुर्विचार करावा असे त्यांनी म्हटले.
ही मदत देताना भ्रष्टाचार रोखण्यासाठी थेट मजूर आणि कामगारांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. व्यवस्थित नियोजन केल्यास अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था दोन्हींच्या समस्यांवर आपण मात करू शकतो, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केलाय.
मी पत्रकार नाही. मी बऱ्याच लोकांशी बंद दरवाज्यात चर्चा करतो. मात्र आता हाच संवाद लोकांसमोर करण्याचा निर्णय मी घेतला असून यातूनच माजी गव्हर्नर रघुराम राजन यांसारख्या लोकांशी संवाद साधत आहे.
केंद्र सरकार योग्य प्रमाणात राज्य सरकारला निधी देत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, केंद्राने राज्यातील बाधितांची संख्या पाहून याचे वितरण करण्याची आवश्यकता असल्याचे गांधी म्हणाले.