नवी दिल्ली - राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त राहुल गांधी यांनी पत्रकारांना मिठाईचे वाटप केले. राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानासमोर त्यांनी पत्रकारांच्या शुभेच्छा स्विकारल्या तसेच स्वत:च्या हाताने त्यांनी पत्रकारांना मिठाई वाटली.
राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. तसेच इतर भाजपच्या नेत्यांनीही राहुल यांना ट्विट करत शुभेच्छा दिल्या. तर काँग्रेसचे अनेक नेते राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी राहुल यांना शुभेच्छा दिल्या.
राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० रोजी झाला. २००३ साली ते राजकारणात सक्रिय झाले. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा सहभाग घेतला. त्यांचे वडील राजीव गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले. सलग ३ वेळा ते अमेठीतून निवडूण आले. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना अमेठीतून पराभव स्विकारावा लागला.