नवी दिल्ली - निवडणुकात प्रचार करत असताना जनता मालक असल्याचे मी म्हणालो होतो. जनतेचा कौल मला मान्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांना शुभेच्छा देतो, असे म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी आपल्या पक्षाचा पराभव स्विकारला. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, आमचा लढा हा विचारधारेचा आहे. यापुढेही तो लढणार आहोत. निवडणुकी दरम्यान आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांचे मी आभार मानतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांन घाबरण्याचे कारण नाही.
मी भारतीयांच्या मतांचा आदर करतो. आजच निकाल लागला, याबद्दल मी फक्त शुभेच्छा देईन. देशात खूप लोक हे काँग्रेसच्या विचाधारेचे आहे. प्रेम कधीच हरत नसते. आमच्यावर प्रेम करणारे देशात अनेक लोक आहेत. या निवडणुकीत अनेकदा माझ्या विषयी वाईट भाषेचा वापर करण्यात आला. मात्र, मी प्रेमानेच बोलेन, माझ्या माझ्या विचारावर ठाम राहणार आहे, असेहा राहुल गांधी म्हणाले.
अमेठीमध्ये राहूल गांधी यांचा स्मृती ईराणी यांनी पराभव केला. या विजयाबद्दल राहूल गांधी यांनी स्मृती ईराणींना शुभेच्छा दिल्या.