ETV Bharat / bharat

बंगळुरूनजीक पिसाळलेल्या बैलाचा दोघांवर हल्ला - bull attack 2 people Annasandrapalya

बैल अण्णासांद्रापाल्या व शास्त्रीनगरला जोडणाऱ्या रस्त्यावर फिरत होता. यावेळी रस्ता परिसरातील एका दुकानात बसलेल्या गुरप्पा व सेल्वाकुमार या दोघांना बैलाने जबर धडक दिली. यात गुरप्पा हा जागेवरच बेशुद्ध झाला.

पिसाळलेल्या बैलाचा दोघांवर हल्ला
पिसाळलेल्या बैलाचा दोघांवर हल्ला
author img

By

Published : Sep 6, 2020, 5:54 PM IST

बंगळुरू - नजीकच्या अण्णासांद्रापाल्यातील एचएएल परिसरात एका पिसाळलेल्या बैलाने दोन नागरिकांना गंभीर जखमी केल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अण्णासांद्रापाल्या येथे पिसाळलेल्या बैलाचा दोघांवर हल्ला

गुरप्पा आणि सेल्वाकुमार अशी जखमीची नावे आहेत. बैल अण्णासांद्रापाल्या व शास्त्रीनगरला जोडणाऱ्या रस्त्यावर फिरत होता. यावेळी रस्ता परिसरातील एका दुकानात बसलेल्या गुरप्पा व सेल्वाकुमार या दोघांना बैलाने जबर धडक दिली. यात गुरप्पा हा जागेवरच बेशुद्ध झाला. इतकेच नव्हे तर, बैलाने त्याच्या शरिराला आपल्या शिगांनी धडकाही दिल्या. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला आहे.

दरम्यान, या बैलाने काल देखील हैदोस घातल्याचे दिसून आले. यावर बैलाला आवर घालण्यासाठी नागरिकांनी त्याच्या गळ्यात दोरी टाकली. मात्र, बैलाचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. बैलाला रेबीज असलेल्या एका कुत्र्याने चावल्याचे बोलले जात आहे. मात्र, या बाबीची अद्याप पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा- 'मोदी सरकारचा 'गब्बर सिंग टॅक्स' जीडीपी घसरण्याचं सर्वात मोठं कारण'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.