श्रीनगर (ज.का)- २४ फेब्रुवारी २०१९ या वर्षी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर जैश-ए-मोहम्मदतर्फे मोठा आत्मघाती बाँब हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान हुतात्मा झाले होते. या प्रकरणी १८ महिन्यानंतर आज राष्ट्रीय अन्वेषण विभागाने राज्यातील जानीपुरा भागातील एनआयएच्या विशेष न्यायालयात आरोपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात १९ जणांसह जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून नमूद करण्यात आले आहे.
१३ हजार ५०० पानी आरोप पत्रात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याचे पाकिस्तानात कशाप्रकारे नियोजन करण्यात आले व त्याची अंमलबजावणी करण्यात आली, याबद्दल माहिती देण्यात आली आहे. मसूद अझहरसह त्याचा भाऊ अब्दुल असगर, अम्मर अल्वी आणि भाचा फारुक यांची नावे देखील आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहेत.
फारुक हा आयसी-८१४ या विमान अपहरण प्रकरणात आरोपी असलेल्या इब्राहीम अतहर याचा मुलगा आहे. अतहर हा पुलवामा हल्ला घडवून आणण्यासाठी भारतात उपस्थित होता. त्याला मार्च २०१९ मध्ये सुरक्षा दलांनी ठार केले होते.
...असा झाला होता पुलवामा हल्ला
अदील अहमद दार (वय २० रा. गुंडबाघ, काकपोरा) या जैश-ए-मोहम्मदच्या आतंकवाद्याने पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा भागातील जम्मू-श्रीनगर महामार्गावर स्फोट घडवून आणला होता. दारने मोठ्या प्रमाणात स्फोटके असलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यातील एका वाहनावर धडकवली होती. यात मोठा स्फोट होऊन ४० जवान हुतात्मा झाले होते.
या घटनेने संपूर्ण देश हादरले होते. त्यानंतर, भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील तनाव विकोपाला गेले. भारताने नंतर पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई हल्ला करून देहशतवाद्यांची शिबीरे उद्धवस्त केली होती. तेव्हापासून या दोन्ही देशातील संबंध चांगलेच तानलेले आहेत.
दरम्यान, हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे सिद्ध करणारे व फेटाळता न येण्यासारखे पुरावे असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. अटक केलेले आरोपी आणि जैश-ए-मोहम्मदच्या नतृत्वाची हल्ल्यात काय भूमिका होती, याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर, दहशतवाद्यांच्या फोन कॉल्सबद्दलही माहिती देण्यात आली आहे. आरोपपत्रात दाखल १९ आरोपींपैकी ७ जण चकमकीत ठार झालेले आहेत.
मसूद अझहर (पाकिस्तान), रऊफ अल्वी (पाकिस्तान), अम्मर अल्वी (पाकिस्तान), शकीर बशीर (काकापोरा), इन्शा जान (काकापोरा), पीर तारिक अहमद शाह (काकापोरा), वैझ-उल-इस्लाम (श्रीनगर), मोहम्मद राथेर (कोकोपुरा), बिलाल कुच्चे (लालहार), मोहम्मद इस्माईल (पाकिस्तान) सह इतर ९ आरोपींचा आरोपपत्रात समावेश आहे.
हेही वाचा- लाचखोरीचा आरोप झालेल्या व्हेक्ट्रा कंपनीचे सर्व सौदे संरक्षण मंत्रालयाकडून रद्द