नवी दिल्ली - आज (शुक्रवारी) आघाडीच्या मित्रपक्षांसह शिवसेनेसोबत चर्चा होणार असून त्यानंतरच सत्तास्थापनेबाबतची सविस्तर माहिती दिली जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस आघाडीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. यात अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.
हेही वाचा - शरद पवारांमुळे टिकेल महाशिवआघाडीचे सरकार - रामदास आठवले
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गुरुवारी दिल्लीत झालेली बैठक ही शेवटची होती. यानंतर सर्व बैठका मुंबईत होणार आहेत. सध्या आघाडीमध्ये पूर्ण एकमत झाले असून आज मुंबईत निवडणुकीपूर्वीच्या मित्रपक्षांसह शिवसेनेसोबत चर्चा करणार असल्तयाचे चव्हाण म्हणाले. त्यानंतरच सत्तेत कोणाला किती वाटा मिळणार याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. त्यानंतरच तिन्ही पक्षांनी मिळून सत्तास्थापनेबाबत माहिती देऊ, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.